संभाजीराजेंच्या एका विनंतीवर CDS रावत यांचा २ वेळा कोल्हापूरला महापुरात मदतीचा हात

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता.
CDS Bipin Rawat &Chhatrapati Sambhajiraje
CDS Bipin Rawat &Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

पुणे : देशाच्या तीनही सैन्य दलांचे प्रमुख (CDS)जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे आज (ता.8 डिसेंबर) तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर भागामध्ये एका डोंगराळ परिसरात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातामध्ये वायुसेनेचे एक अधिकारी बचावले असून ते गंभीर जखमी असून वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

CDS Bipin Rawat &Chhatrapati Sambhajiraje
यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असतानाही लष्करावर कोसळलं होतं आभाळ

रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रावत यांच्या मृत्यूवर छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. संभाजीराजे म्हणाले, रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही.

संभाजीराजे त्यांची आठवण सांगतांना म्हणाले, 2017 साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. तसेच, 2019 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते.

CDS Bipin Rawat &Chhatrapati Sambhajiraje
बिपीन रावत यांच्या निधनाचा चटका; या महत्वाच्या व्यक्तींसाठीही हवाईप्रवास ठरला अखेरचा!

छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता. जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे. संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अकरा मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली..! अशा शब्दात संभाजी राजेंनी श्रध्दांजली वाहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com