
सांगली : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज मंडई लवकरच सुसज्ज, ‘हायटेक’ बनवली जाईल,’’ असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. भाजी मंडईतील भाजी आणि फळ विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाले, फास्टफूड विक्रेर्त्यांनी आमदार गाडगीळ यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन केले होते, त्या वेळी सुधीर गाडगीळ बोलत होते.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार संयोजक होते. माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘माजी आमदार संभाजी पवार यांच्यामुळे राजकारणात आलो. त्यांच्याच कार्याचा आदर्श समोर ठेवून भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांना समवेत घेऊनच सांगलीच्या विकासासाठी काम करीत आहे.
त्यामुळे भाजी मंडई अधिकाधिक चांगली करणार आहे. शहरातील भाजीविक्रेते, फळ विक्रेते, फास्टफूडवाले, फेरीवाले यांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देणार आहे.’’
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘लाडक्या बहिणीला आता २१०० रुपये दरमहा मिळणार आहेत. ती रक्कम तीन हजार करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ शासन दरबारी प्रयत्न करणार आहेत.’’
पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘आप्पा (संभाजी पवार) ज्याप्रमाणे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाल्यांच्या प्रश्नांसाठी काम करीत, त्याचप्रमाणे सुधीर गाडगीळ सुद्धा काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे.’’
स्मिता पवार, विजय साळुंखे, भाजी विक्रेते व फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष श्याम कोकरे, मीना चौगुले, आशा कोकरे, प्रकाश माळी यांच्यासह फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाडीवाले, फळ विक्रेते व फास्टफूड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.