उच्च न्यायालयाची मुख्यमंत्री शिंदेंना सणसणीत चपराक; ‘परिस्थिती बदलावी ही माफक अपेक्षा'

Eknath Shinde | Shivsena : मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड असल्याचे वृत्त आम्ही वाचले
Eknath Shinde | Shivsena
Eknath Shinde | Shivsena Sarkarnama

मुंबई : सर्वसामान्यांचे सरकार म्हणून सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज सणसणीत चपराक लगावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड असल्याचे वृत्त आम्ही वाचले पण, त्याबाबत न्यायालयाचे काहीही म्हणणे नाही. फक्त त्याचवेळी त्यांच्या भागातील शाळेत जायला संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रस्तेही बनवायला हवेत, असे मत मांडत न्यायालयाने ही परिस्थिती बदलावी ही माफक अपेक्षा आहे, असे म्हटले आहे. (Eknath shinde latets news)

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील खिरवंडी या दुर्गम भागातील गावामधील काही मुलींचा शिक्षणासाठीचा जीवघेणा प्रवास एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला होता. विद्यार्थ्यांच्या या संघर्षाची उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर आज (गुरूवारी) न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

याबाबत निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात दोन हेलिपॅड असल्याचे वृत्त नुकतेच वाचले. मात्र त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणणे नाही. परंतु त्याचवेळी त्यांच्या भागातील शाळेत जायला संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रस्तेही बनवायला हवेत, अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे.

न्यायालयाने याबाबत काही आदेशही दिले आहेत. मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन सकारात्मक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिवाय बैठकीनंतर मुख्य सचिव त्यांच्या मतासह सध्याच्या प्रकरणातील प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा अहवाल तयार करतील. हा अहवाल 30 ऑगस्टपर्यंत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव पदाच्या अधिकाऱ्याच्या प्रतिज्ञापत्रासह न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com