

Solapur, 22 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली आहे. विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजेंद्र राऊत यांना अभिनंदनाचा फोन आला. तो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना ४८३, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली आहेत. तब्बल १३ मते बाद ठरली आहेत. भाजपे राऊत हे ३६५ मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामुळे महायुतीची मते राऊतांच्या पारड्यात पडल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या नेतेमंडळींसोबत विजयाचा गुलाला उधळला. विजय साजरा करत असतानाच राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करणारा फोन आला. अभिनंदन राजाभाऊ, अशा शब्दांत त्यांनी राऊतांचे अभिनंदन केले.
त्यावर राऊत यांनी निवडणुकीचे चित्र मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. आपण ३६५ मतांनी सीट आली, साहेब. आपणास ४८३ आणि विरोधकांना ११८ मते मिळाली आहेत, साहेब. तुमच्या आशीर्वादाने झाली साहेब सगळं. जयाभाऊंनी फार मनावर घेतलं होतं. असं म्हणत भेटायला येतो, असे राऊत म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मस्त मस्त म्हणत भेटायला या या, असे सांगितले.
भाजप आणि महायुतीकडे भक्कम संख्याबळ असल्याने सोलापूरची निवडणूक एकतर्फी मानली जात होती. भाजप नेते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना ही निवडणूक बिनविरोध अपेक्षीत होती. मात्र, काँग्रेसचा अर्ज बाद होताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक हातात घेतली होती, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र, भरभक्कम संख्याबळाच्या आधारे शेवटी भाजपने बाजी मारली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.