CM Shinde : पृथ्वीराज चव्हाणांची शिफारस अन् मुख्यमंत्र्यांकडून 18 कोटी 61 लाखांचा प्रस्ताव मंजूर!

Malkapur Congress : मलकापूर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार
CM Shinde and Malkapur  Congress
CM Shinde and Malkapur Congress Sarkarnama

विशाल वामनराव पाटील -

Malkapur News : महायुतीचे सरकार राज्यात असून काँग्रेस विरोधी बाकावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने तब्बल 18 कोटी 61 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

या मंजुरीमुळे सत्ता असो अथवा नसो परंतु कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामे होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मलकापूर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या प्रस्ताव मंजुरीमुळे मलकापूर शहरातील केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटी मिळणार आहे.

कै. आ. भास्करराव शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना तत्कालिन ग्रामपंचायत, नगरपंचायत व सध्याच्या नगरपालिकेने सन 2009 पासून अखंडितपणे कार्यरत ठेवली आहे. दरम्यान, सध्याच्या अंदाजे 45000 लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना 20-22 तास पंपिंग करुन चालविली जात आहे.

त्यामुळे भविष्यात मलकापूर शहराची लोकसंख्या वाढीचा विचार करुन केंद्र शासनाचे अमृत 2.0 अभियानाअंतर्गत चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने 8 डिसेंबर 2022 रोजी सदर योजनेस मान्यता देऊन अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. याअनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर प्रस्तावास मान्यता देण्याबाबत शिफारस पत्र दिले होते.

CM Shinde and Malkapur  Congress
Lok Sabha Election : अमोल कोल्हे 'अ‍ॅक्शन मोड'वर; गाव, गोठ्यास भेट अन् 'एसटी'त उभा राहून प्रवासही!

या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने ही मलकापूर वासियांसाठी दिवाळी भेट ठरली आहे. याकामी राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीय उदयसिंह पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, कमल कुराडे, सौ.नंदा भोसले, तत्कालिन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पराग कोडगुले, तसेच सध्याचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, आत्माराम मोहिते, सौ.प्रिया तारळेकर, जगन्नाथ मुडे, रविंद्रनाथ टिळे यांनी सदर प्रस्ताव पाठपुरावा करण्यासाठी व प्रस्ताव तयार करण्यासाठी सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com