Chitra Wagh News : 'साताऱ्यातील ताईंच्या भावना हायकमांडकडे पोहोचवणार'; उदयनराजेंसाठी 'वाघांची' डरकाळी!

Satara Political News : आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील...
Chitra Wagh News  Udayanraje Bhosale
Chitra Wagh News Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी आज महिला मेळाव्यात झाली. यावेळी चित्रा वाघ यांनी उदयनराजेंना उमेदवारी मिळावी, ही साताऱ्यातील सर्व ताईंची इच्छा असून त्यांचा भावना आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने महिला दिनानिमित्त नारीशक्ती वंदना मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यानंतर चित्रा वाघ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी महिलांनी देश का नेता कैसा हो उदयनराजे जैसा हो, उदयनराजे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chitra Wagh News  Udayanraje Bhosale
Rashmi Shukla Tapping | राजकारण तापणार : 'सीबीआय कुचकामी, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार'; वडेट्टीवारांचा आरोप..

आजच्या मेळाव्यात सर्व महिलांनी उदयनराजेंच्या उमेदवारीची मागणी केली आहे, नेमकी काय भूमिका आहे आपली, यावर चित्रा वाघ म्हणाल्या, एक बहिण म्हणून जी माझी इच्छा आहे. तीच इच्छा साताऱ्यातील प्रत्येक ताईंची आहे. इच्छा व्यक्त करणे हे साताऱ्यातील बहिणींचा धर्म आहे. तो आम्ही पूर्ण करतोच. या सगळ्या बहिणींचा विचार आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोचविणे हे कार्यकर्ती म्हणून माझे कामच आहे. आम्हा सर्व बहिणींच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सकारात्मक व योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीतून लोकसभेसाठी (Lok Sabha) यावेळेस किती महिलांना उमेदवारी दिली जाईल, या प्रश्नावर चित्रा वाघ म्हणाल्या, विधान परिषद व विधानसभेत सर्वात जास्त महिला आमदार या भाजपच्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्यांनी पुरुषांना संधी पण, आमचा एकमेव पक्ष आहे की ज्याने महिलेला संधी दिली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सुद्धा महिलांनाच प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. इतके वर्षे महिलांना लोकभेत व विधानसभेत आरक्षण देऊ अशा विरोधकांनी वल्गना केल्या होत्या. पण हे सर्व मोदींनी प्रत्यक्षात आणून दाखविले. त्यामुळेख ‘हम सपने नहीं हाकीकत गुनते है, तभी तो सारे मोदींको चुनते है,’ असे त्यांनी नमुद केले.

Chitra Wagh News  Udayanraje Bhosale
Manchar NCP News : मंचरच्या मेळाव्यात अतुल बेनकेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, दादांना शपथविधीसाठी...

'त्यांचे' मानसिक संतुलन बिघडलंय -

गृहमंत्र्यांचे काम बरोबर असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका सुप्रिया सुळे (Surpiya Sule) यांनी केली आहे. यावर चित्रा वाघ म्हणाल्या, मोठ्या ताईंना थोडा विचार करायला वेळ द्या. त्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्या चांगल्याच हलल्या आहेत. तुम्ही त्यांना इतके वर्षे पाहताय, त्यांच्या मनाचा थोडा विचार करा. त्या बोलत असतील तर त्याकडे फार लक्ष देऊ नका, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com