Solapur BJP : सोलापूर भाजपमधील वाद पेटला; कल्याणशेट्टी, काळे, पवारांविरोधात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निरीक्षकांकडे तक्रारी

Solapur Lok Sabha Defeat : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला निरीक्षक म्हणून आलेले धनंजय महाडिक यांच्याविरोधात काहींना आक्षेप घेत गोंधळ घातला.
Sachin Kalyanshetti-Narendra kale-Shahaji Pawar
Sachin Kalyanshetti-Narendra kale-Shahaji PawarSarkarnama

प्रमिला चोरगी

Solapur, 23 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला निरीक्षक म्हणून आलेले धनंजय महाडिक यांच्याविरोधात काहींना आक्षेप घेत गोंधळ घातला. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीची सर्व यंत्रणा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांच्या मनमानी कारभारामुळे भाजपला सोलापुरात पराभव पत्कारावा लागला, अशी तक्रार बंद खोलीत सोलापूर दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे पराभवानंतर सोलापूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव झाला आहे. त्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी सोलापूरमध्ये शनिवारी (ता. २२ जून) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला निरीक्षक म्हणून खासदार धनंजय महाडिक आले होते. मात्र, महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत काम केले होते. तो मुद्दा उपस्थित करताच बैठकीत एकच गोंधळ झाला.

गोंधळानंतर पत्रकारांना बाहेर काढून बंद खोलीत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांवरच आरोप केले. त्यात कुरघोडीचे राजकारण दिसून आले. जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांच्या हाती लोकसभा निवडणुकीची यंत्रणा देण्यात आली होती. त्यांची मनमानी आणि चुकीच्या नेत्यांच्या हाती यंत्रणा दिल्यामुळे सोलापुरात भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे, अशा तक्रारी बंद खोलीत निरीक्षकांकडे नोंदविण्यात आल्या आहेत.

शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यावर सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जबाबदारी होती. तरीही दक्षिण सोलापुरातून मताधिक्य न मिळण्यात काळेही तेवढेच जबाबदार आहेत, अशी तक्रार सोलापूर दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Sachin Kalyanshetti-Narendra kale-Shahaji Pawar
Omraje Nimbalkar On Reservation : ओमराजे निंबाळकरांनी सुचवला आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा मार्ग

प्रमुख नेत्यांच्या बेजबाबदारपणामुळे पराभव...

लोकसभेच्या मागील दोन निवडणुकीची संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी सोलापूर शहर उत्तर अर्थात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर होती. भाजपचा त्या दोन्ही निवडणुकीत विजय झाला होता. पडझडीच्या काळातही आम्ही सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून सुमारे ३६ हजारांचे मताधिक्य सातपुते यांना देण्यात यशस्वी ठरलो आहे. प्रमुख नेत्यांच्या बेजबाबदारपणामुळेच सोलापुरात भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे, अशी तक्रार सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक धनंजय महाडिक यांच्याकडे केली आहे.

निष्ठावंतांचा विचार करा; अन्यथा विधानसभेला वेगळे चित्र

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मेहनत घेतली आहे, त्यामुळेच या मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळू शकलेले नाही. पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घ्यावी आणि विधानसभेला आयारामांना संधी देण्याऐवजी निष्ठावंतांचा विचार करण्यात यावा; अन्यथा विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे दिसेल, असा इशारा सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Sachin Kalyanshetti-Narendra kale-Shahaji Pawar
Dilip Walse On Sharad Pawar : 'माझ्या नोकरीसाठी पवारसाहेबांनी फोन केला'; दिलीप वळसे पाटील यांनी सांगितला 'तो' किस्सा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com