RAY Nagar News: 'रे नगर'चे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण; रोजगाराचं काय? काँग्रेसचा सवाल

Solapur Politics: प्रवास खर्च वाढणार
RAY Nagar News
RAY Nagar NewsSarkarnama

Solapur: सोलापूरमध्ये असंघटीत कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या रे नगर या जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. कष्टकरी कामगारांसाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे. मात्र ही स्वप्नपूर्ती कामगारांसाठी थोड्या समस्या वाढवणारी आहे. रे नगरमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा उद्योग अथवा रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी रे नगर वसाहतीमध्येच रोजगार उपलब्ध व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापुरातील रे नगर वसाहतीमधील 15,000 घरांचे लोकार्पण करणार आहेत. 30000 घरांचा हा प्रकल्प माकप नेत्यांच्या संकल्पनेतून पुढे आला होता. सुरुवातीला 2013 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात रखडलेला हा प्रकल्प 2014 नंतर राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मार्गी लागला. आता या प्रकल्पाचे लोकापर्ण होत असताना या प्रकल्पामुळे रोजगाराची समस्या निर्माण होणार असल्याचे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले आहे.

अधिक खर्च होणार

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विडी व यंत्रमाग सेलचे अध्यक्ष नागेश रामलु बोमड्याल यांच्या मते असंघटीत कामगारांना पक्की घरे मिळाली ही आनंदाची बाब आहे. मात्र ज्यावेळी हे कामगार रे नगरमध्ये स्थलांतरीत होतील, त्यावेळी त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात अधिक वाढ होणार आहे. कारण रे नगर हे औद्योगिक क्षेत्रापासून 7 किमी अंतरावर आहे. सध्या कामगार औद्योगिक वसाहतीच्या परिसरातच भाड्याने घरे घेऊन वास्तव्याला आहेत. शिवाय या ठिकाणी रोजगारासह शाळा, आरोग्य यंत्रणा, बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र रे नगरमध्ये काही कालावधीसाठी याबाबत असुविधा निर्माण होऊ शकतात. यासाठी काँग्रेस नेत्यांनी गेल्या 15 वर्षापासून गोदूताई परुळेकर कामगार वसाहतीमधील मुलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याचे उदाहरणही दिले. जर 15 वर्षापासून या वसाहतीमध्ये विकास झाला नाही. रोजगाराची निर्मिती झालेली नाही. तर मग रे नगरचे काय ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

रे नगर वसाहतीमध्ये सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज घरे कामगारांसाठी उपलब्ध आहेत. त्यांची निवाऱ्याची मुलभूत गरज पूर्ण होणार आहे. मात्र रोजगारासाठी कामगारांना औद्योगिक वसाहतीमध्ये जावे लागणार आहे. त्यासाठी प्रवास खर्च वाढणार आहे. शिवाय या असंघटीत कामगारांचे मासिक उत्पन्न अत्यल्प आहे. त्या उत्पन्नामध्ये या वसाहतीमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर वीज बिल, पाणी बिल, या खर्चाचाही समावेश होणार आहे. अशा परिस्थितीत कामगारांना गृहकर्जाचा मासिक हप्ताही भरावा लागणार आहे. त्यामुळे कामगारांना खर्च कमी करण्यासाठी रे नगर परिसरातच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे गरजेच आहे. याशिवाय बिडी कामगारांना रोजगार नाही तर किमान वेतन मिळणे आवश्यक असल्याचे मतही काँग्रेसने व्यक्त केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरपरिषदेचा दर्जा द्या..

कामगारांसाठी कुभांरी परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र राहायला निवारा याशिवाय त्या ठिकाणी रस्ते, शिक्षण, आरोग्य इत्यादी सोयीसुविधांचा अभाव आहे. याचा विकास करण्यासाठी एक स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे गरज असून कुभांरी गावातील रे नगर, गोदूताई परूळेकर कामगार वसाहतीना समाविष्ट करत नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदनही सादर केले जाणार असल्याची माहिती कामगार नेते बोबड्याल यांनी दिली.

यंत्रमाग व विडी कामगारांच्या समस्यांबाबत

पंतप्रधान मोंदीना देण्यात येणाऱ्या निवदेनाच्या माध्यमातून यंत्रमाग क्षेत्रातील सर्व घटकांतील कामगारांना पी.एफ मिळावा, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे. विडी कामगारांना किमान वेतन आणि 3000 रु पेंशन मिळावी.तसेच सोलापुरातील बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कामगार वसाहती परिसरात लघू उद्योग आणि आयटी पार्क उभे राहावेत, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

RAY Nagar News
ShivSangram : शिवसंग्राम संघटनेत फूट; मेटे यांचे सख्खे भाऊ संघटनेतून बाहेर; नवी संघटना स्थापन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com