Karad Congress News : काँग्रेसकडे धुलाई मशीन नाही; वैचारीक अधिष्ठान : भाई जगताप यांचा भाजपला टोला

Satara Loksabha सातारा लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी काँग्रेसच्या सातारा जिल्हा मतदार संघाचे निरीक्षक आमदार जगताप हे आले होते. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Devendra Fadanvis, Bhai Jagtap
Devendra Fadanvis, Bhai Jagtapsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad Congress News : पंतप्रधानांनी देशात विरोधकच नाहीत, असे जाहीर केले होते. तरीही 'आप'च्या केजरीवाल यांनी दोनवेळा दिल्लीत भाजपला भुईसपाट केले. चार राज्यात काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसमधील अनेक माणसे विरोधी पक्षात आहेत. मात्र, आमच्या पक्षाकडे धुलाई मशीन नाही तर वैचारीक अधिष्ठान आहे. येणाऱ्या निवडणुकीत देशातील, महाराष्ट्रातील जनता आपली चिढ दाखवुन देईल, असा विश्वास आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा Satara Loksabha मतदार संघातील आढावा बैठकीसाठी काँग्रेसच्या सातारा जिल्हा मतदार संघाचे निरीक्षक आमदार जगताप Bhai Jagtap हे आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.श्री. जगताप म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या लोकसभा मतदार संघातील उमेदवार निवडीसाठी काँग्रेसने आढावा बैठकींचे आयोजन केलेले नाही. तर त्या लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या भावना जाणुन घेण्यासाठी बैठक घेत आहोत.

कऱ्हाडच्या कार्यकर्त्यांनी अधिक भावनिक होवुन कार्यकर्त्यानी चर्चा केली. त्यातुन एक वेगळी उर्जा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत दिसून येत आहे. 15 ऑगस्टला आम्ही आमचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. काँग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये सदस्य जास्त आहेत. त्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे.

जगताप म्हणाले, काँग्रेस पक्षातून गेलेली अनेक माणसे विरोधी पक्षात आहेत. मात्र धुलाई मशीन आमच्याकडे नाही. आमच्या काँग्रेस पक्षाकडे वैचारीक अधिष्ठान आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेची सत्ता आली. येणाऱ्या निवडणुकीत देशातील, महाराष्ट्रातील जनता आपली चिढ दाखवुन देईल. लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड चीड आहे. ती चीढ कर्नाटकात दिसली आणि महाराष्ट्रातही दिसेल.

Devendra Fadanvis, Bhai Jagtap
Sanjay Raut म्हणाले, ' shivsena न विस्तारण्यामागे भाजप जबाबदार | Atal Bihari Vajpeyi | Sarkarnama

पंतप्रधान यांनी सत्तेत आल्यापासून दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आम्ही सत्तेवर आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधीचा परदेशातील काळा पैसा आणु असे सांगितले. काळा पैसा आलाच नाही उलट त्यांचे तोंड काळे झाले. छोटे पक्ष संपवण्यासाठी भाजपची रणनिती सुरु आहे का या प्रश्नावर ते म्हणाले, पंतप्रधान यांनी देशात विरोधकच नाहीत असे जाहीर केले होते.

तरीही आपच्या केजरीवाल यांनी दोन वेळा भाजपला भुईसपाट केले आहे. विरोधक नाहीत म्हणता मग काँग्रेसची चार राज्यात सरकार कसे येते. पंतप्रधानांनी सांगीतलेली, घोषणा केलेली एकही गोष्ट पुर्ण झालेली नाही. त्यामुळे लोकांच्यात त्याच्याबद्दल चिढ आहे. सध्या मुंबईत काँग्रेसचे एक नंबरवर असेल मला खात्री आहे. कारण देशाचा वैभव, विकास हा सर्वधर्मसमभाव काँग्रेसकडे आहे.

Edited By : Umesh Bambare

Devendra Fadanvis, Bhai Jagtap
Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com