Satej Patil : 'गोकुळ' वादाला नवं वळण! सतेज पाटलांचा फडणवीसांच्या विश्वासूला इशाराच; 'विधानसभेच्या राजकारणातून टार्गेट नको'

kolhapur politics Over shivaji patil gokul ed inquiry controversy : गोकुळबाबत ईडीच्या चौकशीपर्यंतचे वक्तव्य करत भाजप पुरस्कृत आमदार शिवाजी पाटील यांनी कोल्हापूरचं राजकारण तापलं आहे. यावरून आता काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आवाहनही केलं आहे.
Satej Patil
Satej Patil sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ आणि जिल्हा बँकेला राजकारणात टार्गेट करू नये असे आवाहन केले.

  2. शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ईडी चौकशीचा मुद्दा उपस्थित केला.

  3. शेतकऱ्यांच्या संस्थांची प्रतिमा जपण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kolhapur gokul politics News : आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे ईडीच्या चौकशीपर्यंतचे काही विषय आहेत का? विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला टार्गेट करू नये, जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ या संस्था जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या तारणहर्ता आहेत. त्यांना विनंती आहे की त्या बदनाम होता कामा नये, याची दक्षता आपण घेऊ, असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

महापालिकेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय प्रवेशासाठी आले असता सतेज पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘भाजपची मोडस ऑपरेटी आहे. ज्यावेळी एखादे प्रकरण पुढे न्यायचे असेल, त्यावेळी किरीट सोमया हे भाजपचे तारणहार पुढे येऊन ताबडतोब जबाबदारी घेतात. आता कदाचित ते दोन-चार दिवसांत कोल्हापूरला येतील.

वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे चौकशीची मागणी करतील. संघात महायुतीचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय चालले आहे ते बघून घ्यावे. आमच्या विरोधातील काहीजण संचालक मंडळात आहेत. ते प्रत्येक बोर्ड मीटिंगला अजेंड्यावर, ठराव मंजुरीवर सह्या करतात. मग त्यांनी बघितले नाही का, असे म्हणायचे आहे का? जिल्हा बँक, गोकुळ या संस्था बदनाम झाल्या, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो.’

Satej Patil
Satej Patil Anger : सतेज पाटील संतापले, 'हे काय माझ्या घरचं लग्न नाही...', 'त्या' नाराजांची खरडपट्टी

आमदार पाटील म्हणाले, ‘गृहखात्याला खरात प्रकरणाची तीन महिन्यांपूर्वी माहिती होती अशी आमची माहिती आहे. व्यवहार कोणाचे आहेत, लागेबांधे आहेत का, याची एसआयटी चौकशी सुरू आहे. खरातसारखी प्रवृती महाराष्ट्रात होता कामा नये, यासाठी आता तातडीने कारवाई होणे हे महाराष्ट्रातील महिला व जनतेसाठी महत्त्वाचे आहे. ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांनी खुलासा करणे अपेक्षित आहे. दीपक केसरकरांवर आरोप झाला असेल, तर त्यांनी खुलासा केला पाहिजे. रूपाली चाकणकर यांनीही माध्यमांसमोर येऊन म्हणणे मांडावे.’

दरम्यान हसन मुश्रीफ महायुती सरकारमध्ये मंत्री असूनही त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचा धर्म पाळलेला नाही. जिल्हा परिषद व इतर निवडणुकींत प्रत्येक तालुक्यात त्यांनी महाविकासच्या घटक पक्षांशी संधान बांधून निवडणुका लढविल्या व जिंकल्या. 'खायाचं महायुतीचं, गुणगाण मात्र महाविकासचं' असे ते वागत आहेत, असा घणाघाती निशाना आमदार शिवाजी पाटील यांनी साधला होता.

तसेच त्यांचे सुपुत्र ‘गोकुळ’चे चेअरमन असून ते स्वतः मंत्री आहेत. त्यांच्या जोडीला आणखीन कोण आहे, हे शोधावे लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. तर ‘गोकुळ’ मधील पैशांतून जिल्ह्यात ‘भाजप’ला संपविण्याचा प्रयत्न मुश्रीफ करत आहेत, असाही आरोप आमदार पाटील यांनी येथे केला. यामुळे आता जिल्ह्यातील वातावरण तापले असून आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला टार्गेट करू नये, असे आवाहन केले आहे.

Satej Patil
Satej Patil : महायुतीत पदवीधरची उमेदवारी निश्चित, संधी साधून सतेज पाटलांनी भैय्या मानेंसाठी खडा टाकला

FAQs :

1. सतेज पाटील यांनी काय आवाहन केले?
गोकुळ आणि जिल्हा बँकेसारख्या संस्थांना राजकारणात बदनाम करू नये असे त्यांनी सांगितले.

2. त्यांनी कोणावर प्रतिक्रिया दिली?
आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

3. ईडीचा उल्लेख का केला गेला?
शिवाजी पाटील यांच्याकडे ईडी चौकशीसंबंधित काही मुद्दे आहेत का असा सवाल त्यांनी केला.

4. गोकुळचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
गोकुळ डेअरीवर राजकीय आरोप होत असल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे.

5. या वादाचा काय परिणाम होऊ शकतो?
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com