चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; ज्येष्ठ नेत्याला लावले गळाला!

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भारतीय जनता पक्ष जिल्हा काबीज करणार
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कुडित्रे (जि. कोल्हापूर) : करवीर काँग्रेसमधून (congress) डॉ. के. एन. पाटील यांच्या भाजप (BJP) पक्षप्रवेशाने भूकंप झाला आहे, हा भूकंप कधी झाला आहे, हे काँग्रेस पक्षाला कळले नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भारतीय जनता पक्ष जिल्हा काबीज करणार, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. (Congress Party's Dr. K. N. Patil's entry into BJP)

फुलेवाडी येथे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक डॉ. के. एन. पाटील यांच्या भारतीय जनता पक्ष पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे अध्यक्षस्थानी होते. या वेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Chandrakant Patil
नातं असावं तर असं : आमदारांच्या वाढदिवसाचा केक कापूनच उपसरपंचपद स्वीकारले!

मंत्री पाटील यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कोरोना काळात मोदी सरकारने ८० कोटी लोकांना दोन वर्ष मोफत धान्य दिले. मोफत लसीकरण केले आणि जगातील ६० देशांना लस पुरवण्याचे काम केले. डॉ. के. एन. पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्याने पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे सांगून त्यांच्या सेवा कार्यात भाजप वाटा उचलेल.

Chandrakant Patil
मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणाऱ्या आवताडेंचे जंगी स्वागत

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात ९५ टक्के वारसदारांना संधी दिली जाते. पै-पाहुण्यांचे राजकारण केले जाते. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात नाही. राज्यात नवीन चेहऱ्यांना संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले.

Chandrakant Patil
...तर शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा : माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला

डॉ. के. एन. पाटील यांनी दोन वर्षांत भाजपचे एक लाख सभासद नोंदणी करणार असल्याचे सांगून करवीर तालुक्यात वाढलेल्या १५ ते २० हजार नवीन तरुण मतदारांपर्यंत भाजप पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी भाजपत प्रवेश केल्याचे सांगितले. सरदार सावंत यांनी स्वागत केले. सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. करवीर अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

सुनील कदम, सत्यजितना कदम, जिल्हाध्यक्ष राहुल चिक्‍कोडे, सचिव नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, अमर जत्राटे, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, अक्षय वर्पे, डॉ. आनंद गुरव, गजानन सुभेदार, कृष्णात भोसले, यल्लप्पा गाडीवडर, आशिष खाडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com