प्रदेशाध्यक्षांचा दौरा चार तासांचा अन्‌ नियोजनासाठी बारा समित्या!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येत्या रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : काँग्रेस (congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole)हे येत्या रविवारी (ता. १३ मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण, पटोले यांच्या दौऱ्याची वेगळ्याच कारणांसाठी चर्चा सुरू झाली आहे. पटोले यांचा मोजून मापून साडेतीन-चार तासांचा दौऱ्याच्या नियोजनासाठी तब्बल १२ समित्या नेमण्यात आल्या आहेत. नेमके त्याचीच कुजबूज शहरात सुरू असून पक्षातील सरंजमशाहीकडे बोट दाखवले जात आहे. (Congress state president Nana Patole's visit to Solapur on Sunday)

भटक्‍या विमुक्‍त जाती-जमातीच्या मेळाव्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी (ता. १३) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. दौरा यशस्वी करण्यासाठी सोलपूर शहर काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी पक्षाने १२ समित्या गठीत केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली.

Nana Patole
बसवेश्वर स्मारक समितीतून भगिरथ भालकेंना डावलले; राष्ट्रवादीत नाराजी!

याबाबत माहिती देताना शहराध्यक्ष वाले म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले हे मुंबईतून हेलिकॉप्टरमधून दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर विमानतळावर येतील. त्यानंतर नेहरू नगर येथील सुशीलकुमार शिंदे बीएड कॉलेजवर रविवारी दुपारी दोन वाजता भटक्‍या विमुक्‍तांचा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यात पटोले मार्गदर्शन करणार आहेत.

Nana Patole
अमोल कोल्हेंच्या स्वप्नातील प्रकल्पांना अजित पवारांकडून बळ!

मेळाव्यानंतर पावणेचारच्या सुमारास हेरिटेज येथे शहर काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नाना पटोले हे मुंबईला रवाना होतील, असे प्रकाश वाले यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होईल, यादृष्टीने शहर काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

Nana Patole
अजितदादांच्या स्टाईलवर मिलिंद नार्वेकर भलतेच खूष; म्हणाले...

दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आघाडीचा निर्णय घेतील. सन्मानपूर्वक वागणूक दिली, स्वाभिमान राखून जागा वाटप झाल्यास निश्‍चितपणे आघाडी करूनच निवडणूक लढविली जाईल. पण, सन्मान न मिळाल्यास शहरातील ११३ जागांवर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहे, असाही इशारा वाले यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com