Congress Vs BJP: काँग्रेसनं मिरजमध्ये भाजपचा 'हा' बडा नेता फोडला; सुरेश खाडेंविरोधात मिळाला तगडा उमेदवार?

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीकडून भाजपला सांगलीत मोठं खिंडार पडलं आहे.मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं भाजपला धक्का दिला आहे.भाजप अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीसांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
Sangli Politics .jpg
Sangli Politics .jpgSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांतच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीकडून महायुतीला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. यात शरद पवारांनी जोरदार आघाडी घेतली असतानाच आता काँग्रेसनेही आपणही यात मागे नसल्याचे दाखून दिलं आहे.

महाविकास आघाडीकडून भाजपला सांगलीत मोठं खिंडार पडलं आहे.मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं भाजपला (BJP) धक्का दिला आहे.भाजप अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मधून मोहन वनखंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. वनखंडे यांची मिरजचे भाजपचे आमदार,कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांच्यामध्ये लढत होण्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

Sangli Politics .jpg
Nana Patole News : सत्तेची हाव नाही, जनतेसाठी काम करत राहणे हीच इच्छा: नाना पटोले

महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्निथला,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम,खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com