Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Solapur Politics: होय, माढा मतदारसंघात आम्ही काँग्रेस.....; नाना पटोले यांनी केले स्पष्ट

Nana Patole News: वर्धा मतदारसंघाबाबत आम्ही चाचपणी करत आहोत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी विधान केले होते.

सोलापूर : होय, माढा मतदारसंघात काँग्रेस आपली संघटनात्मक बांधणी करणारच आहे. प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. ज्यावेळी निर्णय होईल, त्याआधारावर त्या गोष्टी पुढे नेण्यात येतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. (Congress will build organizational structure in Madha Constituency: Nana Patole)

काँग्रेस (Congress) निर्धार महामेळाव्यात रविवारी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी सोलापूरबरोबरच माढा मतदारसंघही आपल्याला जिंकायचा आहे, असे विधान केले होते. माध्यमातून त्याचा अर्थ या मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार, असा लावण्यात आला आहे. त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी वरील गोष्ट स्पष्ट केली.

Nana Patole
Jayant Patil ED Enquiry : कार्यकर्त्यांनो, मुंबईला येऊ नका : जयंत पाटलांचे आवाहन

वर्धा मतदारसंघाबाबत आम्ही चाचपणी करत आहोत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी विधान केले होते. त्यावर नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक पक्षाने चाचणी केलीच पाहिजे. मात्र, जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होणार आहे. महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल, त्याप्रमाणे तेथील निर्णय होतील. पारंपारिक मतदार संघ हा विषय वेगळा आहे. वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही कमिट्या तयार केलेत, त्यात मेरिटच्या आधारावर चर्चा होईल.

Nana Patole
Karjat Bazar Samiti : कर्जत बाजार समितीच्या दोन जागांची फेरमतमोजणी : रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. आमच्यापासून काही जन्माला आलेली लोक वेगळी आहेत. पण, महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. विदर्भात तर फक्त काँग्रेसच आहे, त्यामुळे आज अशा चर्चा करण्याची वेळ नाही, असा टोलाही त्यांनी देशमुख यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com