नगर जिल्ह्यातील पाचवा मोठा नेता कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमागील कोरोनाचे ( Corona ) शुक्लकाष्ट काही थांबताना दिसत नाही.
Corona

Corona

Sarkarnama

Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमागील कोरोनाचे ( Corona ) शुक्लकाष्ट काही थांबताना दिसत नाही. जिल्ह्यात सध्या तीन नगरपंचायती व दोन सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक सुरू आहे. असे असताना जिल्ह्यात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. Corona Positive, the fifth largest leader in the Nagar district

मुंबई येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मोठे नेते कोरोना बाधित आढळून येऊ लागले आहेत. हा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसूत आहे. अशातच युवा आमदार रोहित पवार कोरोना बाधित आढळून आले आहेत. सध्या कर्जत नगर पंचायतच्या चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अशातच रोहित पवार यांना कोरोना बाधित होणे हे राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेला धक्का समजला जात आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती रोहित पवार यांनी स्वतःच सोशल मीडियावरून दिली.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
रोहित पवार म्हणाले, विकास करू शकणाऱ्या पक्षाला कर्जतची जनता सत्ता देईल

रोहित पवार यांच्या जागी आता प्रचाराची धुरा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या सक्षम खांद्यावर येण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. उद्या पासून प्रचाराला सुरवात होईल. 18 जानेवारीला चार प्रभागांचे मतदान तर 19 जानेवारीला सर्व 17 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्या आधीच आमदार रोहित पवार कोरोनामुक्त होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com