आमदार संग्राम जगतापांना न्यायालयाची नोटीस

अहमदनगर ( Ahmednagar ) एमआयडीसी येथील आय. टी. पार्क कार्यान्वित केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप ( MLA Sangram Jagtap ) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे.
MLA Sangram Jagtap
MLA Sangram Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसी येथील आय. टी. पार्क कार्यान्वित केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर पुर्ननिरीक्षण दाव्याची सुनावणी सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांना यामध्ये म्हणणे सादर करण्यासाठी नोटिस काढली आहे. Court notice to MLA Sangram Jagtap

आमदार जगताप यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवली. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आय. टी. पार्क सुरू केला असल्याचे दर्शविले. तरुण- तरुणींना आय. टी. पार्कमध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले. काही तरुण-तरुणींनी व्हिडिओद्वारे आयटी पार्क चालू झाला असून आम्हाला रोजगार मिळाल्याचे सांगितले.

MLA Sangram Jagtap
नगरमधील रस्त्यांमुळे आमदार संग्राम जगताप ठरतायेत राज्यभरात टीकेचा विषय

सामजिक कार्यकर्ता भांबरकर यांनी माहिती अधिकारात एमआयडीसी कार्यालयाकडे आय.टी. पार्कची माहिती घेतली असता, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांच्या 26 ऑक्‍टोबर 2016 च्या परिपत्रकान्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रातून आय. टी. पार्क वगळण्यात आला आहे. ही जागा इतर उद्योजकांना भाडे तत्वावर दिली असल्याचे स्पष्ट केले. या पत्रावरुन आमदार जगताप जाहिरनाम्यातून बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून तसेच निवडणूक प्रचारात आय. टी. पार्क चालू केला आहे, असे सांगितले आहे.

MLA Sangram Jagtap
आयटी पार्क व कॉल सेंटरमधला फरक आमदारांना कळत नाही हे दुर्दैवी - किरण काळे

प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणारे तरुण-तरुणींची देखील फसवणूक केली असल्याची तक्रार भांबरकर यांनी कोतवाली पोलिसांकडे केली होती. पोलिस ठाण्याने हा अर्ज स्वीकारला नाही. यानंतर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. त्यावर कारवाई झाली नसल्याने जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता.

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर 24 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने आमदार संग्राम जगताप, त्यांचा प्रचार करणारे तरुणी दिपाली शामसुंदर वर्मा, सोनाली रवींद्र भरताल, देवेंद्र अशोक वैद्य, संतोष क्षेत्रे, हरीश भोगाडे यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे. 16 डिसेंबर पुढील सुनावणी होणार आहे.

MLA Sangram Jagtap
आमदार संग्राम जगताप म्हणतात, पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला

नऊ हजार रोजगार

आमदार संग्राम जगताप यांनी 2019 मध्ये पत्रकार परिषद घेऊन आय. टी. पार्कमध्ये रोजगार निर्मितीचा वृक्ष लावला आहे. आय. टी. पार्कचा वटवृक्ष होऊन नऊ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. पगाराच्या माध्यमातून 162 कोटी रुपये बाजारपेठेत फिरतील, असे अंदाज वर्तविला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com