Sangli Farmers Latest News :सांगलीच्या (Sangli) वसंतदादा पाटील संचलित दत्त इंडिया साखर कारखान्याच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सांगली न्यायालयाने कारखान्याच्या संचालकांवर एफआरपी (FRP) प्रकरणी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil) यांनी दिली आहे.(Court orders Dutt India Sugar Factory to give sugarcane FRP to farmers)
कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असणारी एफआरपी शेतकऱ्यांना कारखान्याकडून दिली जाते. पण दत्त इंडिया साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ही एफआरपी दिली जात नसल्याने शेतकरी संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश दिला.
ऊसाची एफआरपी म्हणून एक ठराविक रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत एक कायदा आहे. तरीही चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी दिली जात नाही. दिली जाणारी रक्कमही अगदी तुकड्या तुकड्यात आणि उशिरा दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठा असंतोष होता. या प्रकरणी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या विरोधात सांगलीच्या न्यायालयात याचिका दाखल केला.
याप्रकरणी सांगली न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. दत्त इंडियाच्या संचालकां विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन संबंधित उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम दिली जावी, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, हा निकाल राज्यासाठीच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक निकाल असल्याचं,मतही यावेळी रघुनाथ पाटील (Raghunath dada Patil) यांनी यावेळी व्यक्त केलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.