चौंडीत राडा करणाऱ्या पडळकरांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी चापडगाव व चौंडीत ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे देणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाडुळे यांच्या फिर्यादीवरून कलम 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Crime filed against Padalkar )

रवींद्र पाडुळे हे त्यांच्या मित्रांच्या समवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीला गेले होते. अहिल्यादेवींच्या समाधीचे दर्शन घेऊन झाल्यावर परत जात असताना त्यांना पडळकर यांचे शरद पवार व रोहित पवार यांच्या विरोधातील भाषण ऐकू आले, असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gopichand Padalkar
video : गोपीचंद पडळकर- राम शिंदे यांचे चौंडी येथे शक्तीप्रदर्शन

हा गुन्हा काल ( बुधवारी ) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस काय कारवाई करणार यावर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गोपीचंद पडळकर यांना जयंती उत्सव सुरू असताना सभा घेण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. असे असताना ते जयंती उत्सव कार्यक्रम सुरू असताना चौंडीच्या दिशेने निघाले होते. त्यावर पोलिसांनी त्यांना चापडगाव (ता. कर्जत) येथे अडविले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार व रोहित पवार यांच्या विरोधात प्रसार माध्यमांकडे आपले मत मांडले होते. तसेच उत्सव कार्यक्रम झाल्यावर पडळकर चौंडीत गेले. तेथे त्यांनी सभा घेऊन पवार कुटुंबीयांच्या विरोधात वक्तव्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com