जयंत पाटील यांची टीका : भाजपला घोडेबाजार करता येणार नसल्याचे दुःख

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी भाजपवर ( BJP ) जोरदार टीका केली.
Jayant Patil
Jayant Patil SARKARNAMA
Published on
Updated on

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सदस्यांनी हात वर करून करण्यात येणार आहे. या विरोधात भाजपचे नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटायला गेले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी भाजपवर ( BJP ) जोरदार टीका केली. Criticism of Jayant Patil: Sadness that BJP will not be able to sell horses

जयंत पाटील म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सदस्यांनी हात वर करत त्यांची मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपला यात घोडेबाजार करता येणार नाही, हे त्यांना दुःख वाटत असेल. याविरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत हे दुर्दैवी आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील, याचे भाजपला दुःख वाटण्याचे कारण काय? असा टोला जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला लगावला आहे.

Jayant Patil
प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करत होणार आहे. याचे भाजपला दुःख वाटत असेल. लोकशाहीत पारदर्शकता आणि महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे असेही, जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com