Kolhapur NCP : 'दिल्या घरी सुखी राहा'; राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांना चिमटा

Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरातील गणेशोत्सव राजकीय टोलेबाजीने चर्चेचा ठरला.
Kolhapur NCP
Kolhapur NCP Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News: कोल्हापुरातील गणेशोत्सव या वर्षी राजकीय चर्चेने बहरलेला पाहायला मिळाला. गणेश चतुर्थीपासून ते गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत राजकीय टोलेबाजी आणि राजकीय पोस्टरबाजीमुळे उजळून निघाला. गणेशोत्सवाच्या शेवटचा दिवसही याला अपवाद ठरला नाही.

"दिल्या घरी सुखी राहा", असे म्हणत राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांना चिमटा काढला. त्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष यांच्यातील टोलेबाजी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत चर्चेचा विषय ठरली.

Kolhapur NCP
Dharashiv Politics : धाराशिव लोकसभेतून सुरेश बिराजदारांना संधी ? अजित पवारांचा दावा

या वेळी गणेशोत्सवात ठिकठिकाणी स्वागत बूथ तयार करण्यात आले होते. या स्वागत बूथवरही राजकीय चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. महाद्वार रोड, पापाची टिक्की, गंगावेश विसर्जन मार्गावर सर्वच राजकीय पक्षाचे बूथ होते. या सर्वांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या बूथवरील राजकीय टोलेबाजी मिरवणुकीतील चर्चेचा विषय ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या बूथवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शहराध्यक्ष गेल्याने त्यांना माजी जिल्हाध्यक्षांच्या टोलेबाजीचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गटाचा बूथ पापाची टिक्की येथे होता, तर अजित पवार यांच्या गटाचा बूथ गंगावेश येथे होता.

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास हे गणेश विसर्जनावेळी मिरवणूक मार्गावरून जात असताना शरद पवार गटाच्या बूथवर गेले. आदिल फरास हे येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी तेथे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवारही उपस्थित होते. या वेळी या दोघांकडून फरास यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पण याचवेळी सत्कार करत असताना माजी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी फरास यांना चिमटा काढला. "ज्यांना देव म्हणून राजकारण केले, ज्या देवामुळे मोठे झालात, त्या देवाचा हा नारळ आहे. दिल्या घरी सुखी राहा," असे म्हणत आर. के. पवार यांनी आदिल फरास यांना टोला लगावला. त्यानंतर स्टेजवर एकच हशा पिकला.

Edited By- Ganesh Thombare

Kolhapur NCP
Dharashiv Politics: शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, 'बीआरएस' अन् पुन्हा राष्ट्रवादीत फिरणारे प्रशांत नवगिरे कोण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com