‘दामाजी’चे बिगूल वाजले : समाधान आवताडेंना महाविकास आघाडी देणार टक्कर!

दामाजी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर : भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना रंगणार
Damaji Sugar factory
Damaji Sugar factory Sarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेली मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची (Damaji Sugar factory) निवडणूक जाहीर झाली आहे. कारखान्यासाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान, तर १४ जुलैला मतमोजणी होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पोटनिवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) विरुद्ध समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) अशी लढत पहायला मिळणार आहे. (Damaji factory election announced: Maha Vikas Aghadi will contest against BJP)

उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक प्राधिकरण यांनी तब्बल ४१ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ऊस उत्पादक मंगळवेढा, ब्रह्मपुरी, मरवडे, भोसे, आंधळगाव या मतदारसंघातून प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ संचालक निवडले जाणार आहेत. तसेच, सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी, अनुसूचित जाती जमाती प्रत्येकी १ जागा, महिला राखीव प्रतिनिधी २ जागा, असे २१ संचालक या निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत.

Damaji Sugar factory
सोलापूरच्या सत्तेचा रिमोट ‘एमआयएम’कडेच ठेवा : ओवैसींचा खास व्यक्तीला संदेश!

कारखान्यासाठी ३ ते ९ जून या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज भरणार आहे. अर्जाची छाननी १० जूनला सकाळी ११ पासून प्रसिद्ध करण्यात येईल. वैध अर्जाची यादी १३ जूनला निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचे वाटप २८ जून रोजी होणार असून, मतदान १२ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पाचपर्यंत होणार आहे. मतमोजणी १४ जुलै रोजी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Damaji Sugar factory
विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत सर्वाधिक हरकती दामाजी साखर कारखान्याच्या होत्या. हरकतीनंतर काही सभासदांचा समावेश केला, तर काहीचा समावेश न झाल्यामुळे उच्च न्यायालयापर्यत धाव घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बहुसंख्य सभासद हे बिगर ऊस उत्पादक असल्याने तेच कारखान्याचे सत्ताधारी मंडळ ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावणर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com