शनिशिंगणापुरातील चौथऱ्यावरील दर्शनासाठी लागणार पैसे

अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देशभरातील प्रसिद्ध देवस्थान आहे.
Shani Deva
Shani DevaSarkarnama
Published on
Updated on

सोनई (जि. अहमदनगर) - अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देशभरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक शनिशिंगणापूरला येतात. काल ( शनिवार )पासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टने पाचशे रुपये शुल्क घेवून भक्तांना शनिचौथरा दर्शन(पेड) खुले केले आहे. चौथऱ्यावर पुजासाहित्याला बंदी असुन फक्त तेल अभिषेक करीता परवानगी देण्यात आली आहे. काल पहिल्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाशे भक्त या योजनेत सहभागी होवून तीन लाखांची देणगी जमा झाली होती. ( Darshan on Chautharya in Shanishinganapur will now have to be paid )

मागील काही वर्षात कोरोना व सुरक्षेच्या कारणास्तव चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आले होते. याबाबत मागील आठवडय़ात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देशातील इतर देवस्थान प्रमाणे चौथऱ्यावरील दर्शन पेड करण्याचा निर्णय झाला. मंदिरात आलेल्या महिला किंवा पुरुष भाविकांना आपल्या हाताने स्वयंभू शनिमूर्तीवर तेल अभिषेक करायचा असेल तर पाचशे रुपये देणगी ठेवण्यात आली असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. अन्य भाविकांना चौथऱ्याच्या खालून मुखदर्शन व तेथे ठेवण्यात आलेल्या पादुकांचे दर्शन घेता येईल.

Shani Deva
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही शनी दर्शनाला

काल दिवसभरात ऐंशी हजारहून अधिक भाविकांनी शनिशिंगणापूरला भेट देवून दर्शनाचा लाभ घेतला पैकी सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत सहाशे भक्तांनी पाचशे रुपये देणगी भरुन चौथऱ्यावर जावून दर्शन घेतले. यामध्ये शंभरहून अधिक महिला होत्या. महिलांच्या चौथऱ्यावरील दर्शनाबद्दल ग्रामस्थांत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. आज आलेल्या अनेक भाविकांनी देवस्थान निर्णयाचे स्वागत केले आहे.

Shani Deva
साडेसाती फेडण्यासाठी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा शनी दर्शनाला

पूर्वी सर्वांना चौथऱ्यावरुन मोफत दर्शन असताना लोटालोटी होत होती. सुरक्षेचाही प्रश्न होता. हाताने तेल अर्पणची इच्छा असणाऱ्या भक्तांना पाचशे रुपये शुल्क ठेवले आहे. या देणगीचा विकास कामासाठी उपयोग होईल.

- नितीन शेटे, सहायक कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

शुल्क घेवून चौथरा दर्शनाचा निर्णय खुपच चांगला आहे.मात्र देवस्थानने पुजा साहित्यातील सर्व यंत्रावर बंदी घातली असताना व्यावसायिक सक्ती व दादागिरी करीत आहेत त्यावरही ठोस उपाययोजना करावी.काळ्या तिळाच्या नावाखाली सुरु असलेली भक्तांची फसवणूक थांबावी

- परेश पटेल, बडोदा (गुजरात)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com