दशरथ सावंत म्हणाले, साखर सम्राटांचे पुतळे उभे करून शेतकरी, कामगारांना दर्शन घेण्यास भाग पाडले जाते...

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा हा देशातील सहकारी साखर उद्योगाची गंगोत्री समजला जातो.
Dashrath Sawant's book release ceremony
Dashrath Sawant's book release ceremonyShantaram Kale
Published on
Updated on

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा हा देशातील सहकारी साखर उद्योगाची गंगोत्री समजला जातो. या जिल्ह्यात आता सहकारी साखर कारखानदारांनी आपली जहागिरी कशी निर्माण केली व या जहागिरीतून स्थानिकांना कसे गुलाम बनविले यावर जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे. अकोले तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी 'साखर गुलामी' नावाचे पुस्तक लिहून प्रस्थापित राजकारणच उलगडून दाखविले आहे. Dashrath Sawant said that by erecting statues of sugar emperors, farmers and workers are forced to pay obeisance

दशरथ सावंत लिखित 'साखर गुलामी' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी ( ता. 11 ) सकाळी 11 वाजता शेतकरी नेते, विचारवंत विजय जावंधिया यांच्या शुभ हस्ते तर राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली साई लॉन येथे झाले. यावेळी व्यासपीठावर मधुकर नवले, शिवाजी धुमाळ, विठ्ठल चासकर, सोन्याबापू वाकचौरे, गिर जाजी जाधव, जे.डी. आंबरे, शांताराम वाळुंज, कारभारी उगले, पर्वत नाईकवाडी आदी उपस्थित होते. प्रास्तविक शांताराम गजे यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. अजित नवले यांनी करून दिला. पुस्तक परिचय हेरंब कुलकर्णी यांनी दिला.

Dashrath Sawant's book release ceremony
मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय काॅंग्रेसच्या दडपणाखाली ! दशरथ सावंत यांचे पत्र

विजय जावंधिया म्हणाले, राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक असली तरी राग येत नाही याची चिंता वाटते. अवती भोवती साखर कारखाने झाले म्हणजे परिवर्तन होईल मात्र नकारात्मक बदल होऊन साखर कारखानदारी ठराविक लोकांची मक्तेदारी झाली. त्यातून संपत्ती, सत्ता निर्माण झाली. समाजमनाची गुलामी वाढत गेली. साखर गुलामी पुस्तकातून तेच मांडले आहे. दशरथ सावंत यांनी राज्यातील आजारी पडलेले साखर कारखाने शेतकरी संघटनेने चालविण्यास घेऊन राज्यातील आदर्श मॉडेल तयार करावे, असे जावंधिया यांनी सांगितले.

Dashrath Sawant's book release ceremony
हिम्मत असेल, तर माझा राजीनामा घ्या ! `अगस्ती`प्रश्नी मधुकर पिचड चिडले

दशरथ सावंत यांनी सांगितले की, हुकूमशाही, घराणेशाही विरुद्ध केलेला संघर्ष मी माझ्या 'साखर गुलामी' पुस्तकात लिहिला आहे. महाराष्ट्र 'काय होतास तू काय झालास तू' हे चित्र असून मुंबईच्या हुतात्मा चौकात दिमाखाने उभे राहिलेले शेतकरी आणि कामगार हातात हात घालून स्मारक उभे आहे. मात्र साखर कारखान्याच्या जागेवर शेतकरी, कामगाराचे स्मारक होण्याऐवजी साखर सम्राटांचे पुतळे उभे करून गोरगरीब, शेतकरी, कामगार यांना त्याचे दर्शन घेण्यास भाग पाडले जाते. मूल्यांचा नाश झालेला महाराष्ट्र दिसतो. त्याचे चित्र बदलले पाहिजे. राजकीय पर्यायचे प्रतिबिंब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये दिसते. धर्माच्या ध्रृवीकरणावर आपला विश्वास नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व ताकदपणाला लावून केजरीवाल दुसऱ्यांदा निवडून आले असेही सावंत म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात अशोक भांगरे यांनी 'साखर गुलामी' पुस्तकाने आम्हाला ऊर्जा दिली. सावंत यांच्यासोबत आम्ही असून साखर सम्राट विरोधात आमचा लढा सुरू राहील. शेतकरी नेते, विचारवंत विजय जावंधिया यांनी शेतकरी संघटना जीवंत राहिली, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com