Ajit Pawar : काकांनी घेतली पुतण्याची फिरकी! रोहित, तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं...! VIDEO पाहा

Political banter between uncle and nephew in Maharashtra elections: आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार यांची अचानक भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी आपले काका अजितदादांना वाकून नमस्कार केला. अजितदादांनी रोहित यांना 'दर्शन घे काकाचं'असा टोला लगावला.
Rohit Pawar | Ajit Pawar
Rohit Pawar | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Karad News: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका-विरुद्ध पुतण्या सामना रंगला, यात काकांनी बाजी मारली असली तरी कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी मैदान मारलं आहे. त्यांनी भाजचे राम शिंदे यांचा पराभव केला. आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार यांची अचानक भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी आपले काका अजितदादांना वाकून नमस्कार केला.

अजितदादांनी रोहित यांना 'दर्शन घे काकाचं'असा टोला लगावला. रोहित तू थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं... बेस्ट ऑफ लक..., असे अजितदादांनी रोहित पवारांना म्हणाले. त्यानंतर उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रितीसंगमावर येऊन यशवंतरावांना अभिवादन केले. त्यानंतर अजित पवार, रोहित पवार यांनी यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन केले.

Rohit Pawar | Ajit Pawar
Bhokar Assembly Election Result 2024 आजोबा, वडील, आई अन् मुलगी एकाच मतदारसंघातून विजयी ; चव्हाण कुंटुबियांचा असाही विक्रम

रोहित पवार अन् अजितदादा समोरासमोर आले. अचानक रोहित पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला. अजितदादांनी त्यांना आशीर्वाद देत विधानसभा निवडणुकीतील रोहित पवारांच्या विजयाचा संदर्भ देत त्यांची फिरकी घेतली. अवघ्या 1243 मतांनी रोहित पवार यांचा विजय झाला आहे. त्यावरुन 'माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असते,' असे सांगत अजितदादांनी रोहित यांना डिवचलं.

म्हणून मी पाया पडलो..: रोहित पवार

अजितदादांच्या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले," "अजितदादा माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो... शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं माझी जबाबदारी आहे." माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती.. असं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलं... त्याबाबत रोहित पवारांना विचारलं असता, "नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं,उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com