महाराष्ट्र केसरी पैलवानाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन मल्लांनाच महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावता आला आहे.
Sonali Barde
Sonali BardeSarkarnama

राहुरी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन मल्लांनाच महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावता आला आहे. यातील राहुरीचे गुलाबराव बर्डे व श्रीगोंद्यातील अशोकराव शिर्के यांचा समावेश आहे. यातील बर्डे यांच्या मुलीवर काल ( शुक्रवारी ) राहुरीत जीवघेणा हल्ला झाला. ( Deadly attack on Maharashtra Kesari Palwana's daughter )

राहुरी शहरात काल (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता प्रगती शाळेसमोरील आदिवासी समाजाच्या वसाहतीत गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यात, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अहमदनगरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Sonali Barde
पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले, अखेर एक पकडला, राहुरी तालुक्यातील घटना

या प्रकरणी राहुरी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले यात नामदेव पवार, अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, सुरेश नामदेव पवार यांचा समावेश आहे. अंकुश पवारने गावठी पिस्तुलातून सोनाली बर्डेवर गोळीबार केला. सहा महिन्यांपूर्वी दोन कुटुंबांत लहान मुलांच्या खेळण्यातून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

पिस्तुलाची गोळी सोनाली बर्डे यांच्या हाताच्या मनगट व कोपराचा मध्ये लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

Sonali Barde
बापाने अत्याचार करून चिमुरडीचा केला खून, राहुरी तालुक्यात नात्याला काळीमा

कोण आहेत गुलाब बर्डे

सोलापूर येथे 1986ला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मुंबईच्या दिलीप पवार यांना चितपट करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविला. कोल्हापूरच्या मोतिबाग तालमीत त्यांचे काहीकाळ वास्तव्य होते. त्यांची कन्या सोनाली बर्डे या राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत.

गावठी पिस्तुलाची महिन्याभरातील दुसरी घटना

राहुरी शहरात गावठी पिस्तुलातून गोळीबार होण्याची महिन्याभरातील दुसरी घटना ठरली. मागील महिन्यातच राहुरी शहरातील एका टेलर दुकानात युवकावर गावठी पिस्तुलातून हत्या झाली होती. या हत्येचा तपास अजूनही पोलिस करत असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com