Karad Politic's : काँग्रेस नेत्यानं मनातलं बोलून दाखवलं; ‘भाजप प्रवेशाचा निर्णय आयुष्यातील सर्वांत कठीण ठरला’

Manohar Shinde Will Join BJP : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मनोहर शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असून मलकापूर शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
Manohar Shinde
Manohar ShindeSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. शिंदे यांनी सांगितले की मलकापूरच्या प्रलंबित विकासकामांसाठी ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे, जो केवळ सत्ताधारी भाजप सरकारमार्फत मिळू शकतो.

  3. त्यांनी स्पष्ट केले की प्रवेशाचा निर्णय समर्थकांचा सल्ला आणि शहराच्या विकासाचा विचार करून घेतला असून, प्रवेशाची तारीख आमदार डॉ. अतुल भोसले ठरवतील.

Satara, 09 November : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राईट हॅंड म्हणून ओळखले जाणारे मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप प्रवेशाचा निर्णय माझ्यासाठी आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीतील सर्वांत कठीण गोष्ट ठरली आहे. मात्र, मलकापूर शहराचा विकास आणि समर्थकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून मी सत्ताधारी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांनी नमूद केले.

मनोहर शिंदे (Manohar Shinde) म्हणाले, मागील २४ वर्षांच्या वाटचालीमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या समर्थकांना मी न्याय देऊ शकलो नाही, तर काळ मला अजिबात माफ करणार नाही, अशी माझी भावना आहे. मलकापूर शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी त्वरित ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. तो निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो, त्यामुळे मलकापूरच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

मलकापूरच्या विकासासाठी गेली २५ वर्षांच्या कालावधीत सातत्याने प्रयत्न केले आहेत. माजी आमदार (कै.) भास्करराव शिंदे यांची पुण्याई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या आशीर्वादामुळेच मलकापूरमध्ये विविध विकासकामे राबवू शकलो. शहरात २४ तास पाणीपुरवठा योजना राबवून मलकापूरचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला. आम्ही राबविलेल्या अनेक विकासाभिमुख योजनांची दखल सरकारने घेतली, असेही शिंदे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, मलकापूर शहराच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून माझ्या समर्थकांसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. भुयारी गटार योजना अपूर्ण अवस्थेत आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लागणारा निधी, झोपडपट्टी वासीयांसाठीची घरे, शहराचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी निधीची गरज भासणार आहे. निधी केंद्रात असणारे सरकार देऊ शकते.’’

Manohar Shinde
BJP Politics: छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात भाजप पत्ते ओपन करेना! डाव कोण जिंकणार?

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रस्त्यांच्या कामासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी तिथे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासमवेत भेट झाली. त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा आग्रह धरला, तसेच सोबत आलो, तर शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी चर्चा झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विचारात घेऊन शहरवासीयांच्या हिताचा विचार व कार्यकर्त्यांचे प्रश्नांसाठी मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

भाजप प्रवेश कधी होणार, हे आमदार अतुल भोसले ठरवतील

भाजपमध्ये कधी व कोठे प्रवेश करायचा, याचा निर्णय सर्वस्वी आमदार डॉ. अतुल भोसले घेतील. ते जी जबाबदारी देतील , ती पार पाडली जाईल. मात्र, मलकापूर शहराचा विकास हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी कोणतीही मागणी केली नाही किंवा माझी राजकीय इच्छाशक्ती ही त्यांच्याजवळ बोलून दाखवली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मी कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, त्यामुळे भाजपमध्ये जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणाने पार पडण्याचा माझा प्रयत्न राहील.

Manohar Shinde
Umesh Patil's Counterattack : उमेश पाटलांचा यशवंत मानेंवर पलटवार; ‘लाज वाटायला पाहिजे, ती महिला तुमच्याकडं दाद मागायला आली होती...’

Q1. मनोहर शिंदे कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे?
A1. त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Q2. शिंदे यांनी भाजपमध्ये जाण्याचे कारण काय दिले?
A2. मलकापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

Q3. मलकापूरच्या विकासासाठी किती निधीची गरज असल्याचे शिंदे म्हणाले?
A3. त्यांनी ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे सांगितले.

Q4. भाजप प्रवेशाची तारीख कोण ठरवणार आहे?
A4. प्रवेशाची तारीख आणि ठिकाण आमदार डॉ. अतुल भोसले ठरवतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com