'काष्टी'त आमदारांचा पराभव : कैलास पाचपुते गटाचा विजय

हा पराभव आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांचा समजला जात आहे.
Kashti Various Executive Society
Kashti Various Executive SocietySarkarnama
Published on
Updated on

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्था ही देशपातळीवर सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सेवा संस्था समजली जाते. या संस्थेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत माजी अध्यक्ष कैलास पाचपुते यांच्या गटाने सर्व तेरा जागा जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. हा पराभव भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांचा समजला जात आहे. निवडणुकीत नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते जायंट किलर ठरले. ( Defeat of MLAs in 'Kashti': Victory of Kailas Pachpute group )

सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या तेरा जागांसाठी शुक्रवारी (ता. 22) मतदान पार पडले. यावेळी 678 पैकी 674 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी चार वाजता मतमोजणीला सुरवात झाली. या मतमोजणीत राकेश पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांनी सरासरी 30 ते 60 मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणली.

Kashti Various Executive Society
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

काष्टी सेवा संस्थेची निवडणूक दोन्ही गटांतर्फे प्रतिष्ठेची करण्यात आली होती. संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी स्वच्छ कारभाराचा दावा करीत, तर राकेश पाचपुते यांनी सत्ताधाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप करीत निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली होती. अखेर भगवानराव पाचपुते यांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात राकेश पाचपुते यांना यश आले. त्यांच्या मागे अनेकांनी अप्रत्यक्षपणे शक्ती उभी केल्याची चर्चा रंगली होती.

Kashti Various Executive Society
नागवडेंचे पुढचे टार्गेट काष्टी

या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते, माजी उपाध्यक्ष भास्करराव जगताप, माजी सरपंच जालिंदर पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला. विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी : सर्वसाधारण मतदारसंघ - राकेश कैलासराव पाचपुते (395), बाळासाहेब संभूदेव पाचपुते (369), शहाजी शिवाजी भोसले (367), सुभाष साहेबराव पाचपुते (355), सर्जेराव दत्तात्रय पाचपुते (354), रोहिदास पंढरीनाथ सोनवणे (348), विठ्ठलराव जगन्नाथ काकडे (341), लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते (334).

अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग - सुनील काळूराम माने (370). महिला राखीव - सुवर्णा मनोहर भोसले (377), अलका संजय नलगे (364). इतर मागास प्रवर्ग - दादा बाबूराव कोकाटे (356). भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्ग - काशिनाथ आप्पासाहेब काळे (360)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com