महादेव जानकरांनी प्रचारसभा घेऊनही रासपच्या उमेदवाराला मिळाली शून्ये मते!

वैराग नगरपंचायत निवडणुकीत १८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
Vairag Nagar Panchayat
Vairag Nagar Panchayatsarkarnama
Published on
Updated on

वैराग (जि. सोलापूर) : वैरागमध्ये नगरपंचायत (Nagar Panchayat election) अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्यामुळे वैराग शहरातील तब्बल ६२ जणांनी निवडणुकीत आपले नशिब अजमावले. पण, त्यातील १८ जणांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही, तर आमदार महादेव जानकरांच्या (mahadev jankar) राष्ट्रीय समाज पक्षाच्या एका उमेदवाराला तर शून्ये मते मिळाली आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतली होती. (Deposits of 18 candidates in Vairag Nagar Panchayat elections confiscated)

वैराग नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागा जिंकत निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. पहिल्याच निवडणुकीत वैरागकरांनी भूमकर यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीला भरभरून मते दिली. वैरागचा निर्णय वैरागमध्येच झाला पाहिजे, असा भूमिका भूमकरांनी मांडली, त्यास जनतेने जोरदार पाठिंबा दिल्याचे मतपेटीतून दिसून आले.

Vairag Nagar Panchayat
भाजप-शिवसेनेने पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली : राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

दरम्यान, वैराग नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत 62 उमेदवारांनी नगरसेवक होण्यास रिंगणात उडी घेतली होती. नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार न घेता त्यांनी आपले नशिब अजमावण्यासाठी जोरदारपणे लढले होते. पण, भाजप उमेदवार वगळता तब्बल अठरा जणांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तेजस्विनी मरोड या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होत्या, त्यांनाही आपले डिपॉझिट सांभाळता आलेले नाही.

Vairag Nagar Panchayat
सचिन वाझेने घेतली माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचीच झाडाझडती!

या निवडणुकीमध्ये सर्वाधिक अपक्षांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये आठ अपक्ष आणि पाच शिवसेना उमेदवारांचा समावेश आहे. अतुल मलमे, विकास मगर, मुमताज शेख, उज्ज्वला गाढवे, तेजस्विनी मरोड, भाग्यश्री क्षीरसागर, कविता खेंदाड, आनंद गवळी, रवींद्र पवार, अतिश कांबळे, कुलदीपसिंह बायस, चैतन्य लोकरे, संध्याराणी आहिरे, ताजोद्दीन शेख, प्रभाकर क्षीरसागर, शोभा पांढरमिसे, शुभांगी पांढरमिसे, रवींद्र पवार अशा एकूण १८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Vairag Nagar Panchayat
फटेचा भाऊ अन्‌ वडिलांनी कोर्टाला सांगितले, ‘आम्ही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत; सर्वकाही विशाल पाहायचा’!

वैरागमध्ये बहुतांश जागांवर बाजी मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे चैतन्य सुरेश लोकरे या उमेदवाराला शून्य मते मिळाली आहेत. त्यांन स्वतःचेही मत मिळू शकलेले नाही. विशेष म्हणजे जानकर यांनीही वैरागमध्ये येऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेतली होती. बहुजन समाज पक्षाच्या ताजोद्दिन शेख, तर वंचित आघाडीच्या प्रभाकर क्षीरसागर यांचेदेखील डिपॉझिट जप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com