Sangli Politics : जयंत पाटलांच्या सांगलीत राडा, फडणवीस - अजितदादांच्या नगरसेवकांत हमरीतुमरी

Ajit Pawar & Devendra Fadnavis : सांगली महापालिकेच्या मासिक सभेत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला.
Ajit Pawar & Devendra Fadnavis
Ajit Pawar & Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Sangli : ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गळाला लावून अजित पवारांना सत्तेच्या खुर्चीत बसवले, त्याच फडणवीसांचे सांगलीतले नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नगरसेवकांच्या अंगावर धावून गेले. मग अजितदादांच्या कार्यकर्त्यांनीही जशास तसे उत्तर दिले. सरकारमधील मित्रांमध्येच हा वाद झाल्याने भाजप राष्ट्रवादीतही संघर्षाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या होमपीच असलेल्या सांगलीतच अजितदादा आणि फडणवीसांचे कार्यकर्ते भिडले.

सांगली महापालिकेच्या मासिक सभेत गुरुवारी भाजपा(BJP) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पंधरा दिवसांपूर्वी राज्यात सत्तेत दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटात आणि भाजपा नगरसेवक आमने सामने आल्याचं पाहायला मिळाले. यावेळी माजी महापौर आणि भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या हातातील फाईल फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ महापालिकेत तणाव निर्माण झाला.

Ajit Pawar & Devendra Fadnavis
Gadgil Report : चव्हाण, फडणवीस, ठाकरे अन् आताच्या शिंदेंनीही गाडगीळ अहवाल बासनात गुंडाळला !

सांगली महापालिकेत नेमकं काय घडलं...?

सांगली महानगरपालिकेतील महासभेवेळी माजी महापौर आणि भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हातातील फाईल हिसकावत ती फाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही नगरसेवकामध्ये बाचाबाची झाली. तसेच थोरात हे कांबळे यांच्या अंगावर धावून गेले. वातावरणात तणाव निर्माण झाल्यानंतर उपस्थित काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले.

अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government )मध्ये एन्ट्री घेतल्यानं वर्षानुवर्षे राजकीय वैर जपलेल्या नेत्यांनाच आता नाईलाजास्तव का होईना आता मैत्रीचे सूर जुळवून घ्यावे लागत आहेत. राज्यात अनेक मतदारसंघात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांची शिंदे - फडणवीस - पवार युतीमुळे मोठी पंचाईत झाली आहे.

Ajit Pawar & Devendra Fadnavis
Irshalwadi Landslide : CM शिंदेंचा दहा तास इर्शाळवाडीत तळ, आदित्य पावसात, दानवे चिखलात...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामांच्या फाईली घेऊन फिरतात. यावर भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी थोरात हे शासकीय फायली घेऊन फिरण्याबाबत आक्षेप व्यक्त केला. यामुळे वाद आणखीन उसळला. यामध्ये थोरात यांच्या हातातील फायली हिसकावून घेत विवेक कांबळे यांनी फाडण्याचा प्रयत्न केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com