Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंकडून जास्त अपेक्षा ठेवणे उचित नाही; फडणवीसांनी थेट कारणच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : नगरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे. रस्त्याने येताना गर्दी पाहून आज सगळ्या सभांचे गर्दीचे रेकॉर्ड तुटेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Ahmednagar Political News : भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी वडिलांचे विचार बाजूला ठेवलेत. त्यांना आता जनाब उद्धव ठाकरे असे म्हणून बोलवले जाते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती उद्धव ठाकरे यांनी गुंडाळून ठेवली आहे. त्यांच्यासमोर अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात. टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. आता त्यांच्या भाषणाची सुरुवात सुद्धा त्यांनी बदलली आहे. धर्म निरपेक्षतेच्या रांगेत ते जाऊन बसले, त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करणे उचित नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नगरमधील संत निरंकारी भवन शेजारी मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आले असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe Patil यांच्या आशीर्वाद निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी असल्याचा त्यांनी इन्कार केला. युतीत काम करताना सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. युतीत काही जागा घ्यावा लागतात व काही द्यावा लागतात. यामुळे काही जणांची नाराजी होते. मात्र समजावल्यानंतर सगळे समजतात, असेही फडणवीस यांनी आवर्जून स्पष्ट केले.

नगरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या सभेसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे. रस्त्याने येताना गर्दी पाहून आज सगळ्या सभांचे गर्दीचे रेकॉर्ड तुटेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज राज्यात बारामतीसह विविध ठिकाणी मतदान सुरू असल्याने त्यावर ते म्हणाले, "मतदानाची टक्केवारी समाधानकारक नाही. वाढते तापमान हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण लोकशाहीत अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे".

दरम्यान, फडणवीस Devendra Fadnavis यांचे आगमन झाल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आशीर्वाद निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, अनुराधा व राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार Rohit Pawar आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाबाबत फडणवीस म्हणाले, महायुतीच्यावतीने आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही. पण, मी बोलण्यापेक्षा जनताच आता बोलू लागली आहे. भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जनता समजदार आहे. निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आमने-सामने येतच असतात. बारामतीमध्ये मोठी लढत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी, असे घडले असेल. पण त्यामुळे कोणीही अशा घटनांचा वापर करून इमोशनल अत्याचार करू नये, असा टोला रोहित पवारांना फडणवीसांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com