Satara Politic's : महायुतीची 100 मतं फुटताचा गोरेंचा मित्रपक्षांना सूचक इशारा : ‘राजकारणात हिशेब ठेवायला आम्हाला फडणवीसांनी शिकवलंय’

Sangli-satara Vidhan Parishad Election 2026 : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम ५९३ मतांनी विजयी झाले. मात्र महायुतीची सुमारे १०० मते फुटल्याची चर्चा असून जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 22 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम अपेक्षेप्रमाणे विजयी झाल आहेत. त्यांना ५९३ मते मिळाली असून त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभय जगताप यांना २९२ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत महायुतीची तब्बल १०० मते फुटल्याचे मानले जात आहे. त्यावरून भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला आहे, त्यामुळे साताऱ्यात पुन्हा युतीत कुस्ती रंगण्याची चिन्हे आहेत.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत होती. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांचा जो करेक्ट कार्यक्रम केला होता, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होते. त्यामुळे दुखावलेले मित्रपक्ष भाजपवर राग काढतील, अशी निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात चर्चा होती.

भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घालून त्यातून मार्ग काढला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली होती. तीत एकत्रितपणे काम करायचं ठरलं होतं, त्यानुसार स्थानिक नेत्यांना निरोप देण्यात आला होता.

Jaykumar Gore
Gore On Mohite Patil : जयकुमार गोरेंचा हल्लाबोल : मोहिते पाटलांच्या भ्रमाचा भोपळा फुटला; जनतेने त्यांना अदृश्य केलंय

महायुतीच्या वरिष्ठांनी तोडगा काढल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत महायुतीची १०० मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. धैर्यशील कदम यांना ५९१ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली आहेत. कदम यांनी २९९ मतांनी बाजी मारली आहे. फुटलेल्या मताबाबत ग्रामविकास मंत्री गोरेंनी भाष्य केले आहे.

Jaykumar Gore
Krishna Sugar Exit Poll : कृष्णा साखर कारखान्यावर पुन्हा भोसले गटाची सत्ता; ‘एक्झिट पोल’चा अंदाज

राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो. अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतंय, हा वेगळा विषय आहे. राजकारणामध्ये हिशेब ठेवायला लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला राजकारणात हिशेब ठेवायला शिकवलं आहे, असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी करत मित्रपक्षांना सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com