Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची असेल, तर फडणवीस CM व्हायला हवं...'; भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

Suresh Khade On Ladki Bahin Yojna :' लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमचंच सरकार पुन्हा सत्तेत यायला हवं. लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहण्याकरिता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.शासन बदललं की योजना बदलतात.त्यामुळे...'
devendra fadnavis ladki bahin yojana
devendra fadnavis ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : महाराष्ट्रात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. सत्ताधारी महायुती सरकारकडून या योजनेचा गाजावाजा सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्याचा मनसुबा आहे.

तर दुसरीकडे या योजनेचा धसका घेतलेल्या विरोधकांनी महायुती सरकार जर सत्तेतून गेले तर ही योजना बंद होईल असा प्रचार सुरू केला आहे. यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली असतानाच आता कामगार मंत्री आणि भाजप नेते सुरेश खाडे यांनी मोठं विधान केलं आहे.

सांगलीच्या मिरजमध्ये रक्षाबंधनानिमित्त 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ'या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री आणि भाजप नेते सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.आधीच महायुतीतील अपक्ष आमदार रवी राणा आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेबाबत केलेल्या विधानांमुळे महायुती पूर्णत:बॅकफूटला गेली आहे.

यातच आता जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरु ठेवायची असेल तर पुन्हा सरकार येऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं विधान राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे.यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.तसेच विरोधकांना घेरण्याची नामी संधी मिळाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीचंच सरकार कायम ठेवण्याचं आवाहन खाडे यांनी यावेळी केलं आहे.

devendra fadnavis ladki bahin yojana
Assembly Election 2024 : भाजप 2 डझन आमदारांचे तिकीट कापणार; सर्व्हेने वाढवली चिंता

खाडे नेमकं काय म्हणाले..?

सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजमधील भाजपकडून घेण्यात आलेल्या रक्षाबंधनानिमित्त 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ'या मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना मिळाले. पण एक लक्षात ठेवा, स्कीम सुरू राहणं अथवा न राहणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, आमच्यावर नाही.या योजना आपल्या घरातल्या पोरं-बाळं, आई-वडिलांसाठी राहतील. पण ही योजना सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही विचार करायला हवा असेही मत खाडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमचंच सरकार पुन्हा सत्तेत यायला हवं. लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहण्याकरिता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.शासन बदललं की योजना बदलतात.त्यामुळे सरकार बदलू द्यायचं नाही.म्हणजे मग ही योजना सुरू राहील.योजनेचे पैसे आम्ही पुढे वाढवू.यापुढे आपलं सरकार आणि देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा असा कानमंत्रही मंत्री सुरेश खाडे यांनी महिलांना दिला.

खाडे म्हणाले, या योजनेच पैसे जमा झाल्यानंतर आपण अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू बघितले आहेत.सरकारच्या,भावांच्या प्रती आदर पाहिला असून यापेक्षा आणखी दुसरं काय हवं आहे.तुम्ही प्रपंच चालवताना कसरत करता, तसं सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

devendra fadnavis ladki bahin yojana
Mahayuti News :'...नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही!'; भाजप अन् शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com