फडणवीसांनी दिला अक्कलकोटमधील नूतन सरपंचांना कानमंत्र : कल्याणशेट्टींनी केला २० सरपंचांचा सत्कार

भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज एकूण २० सरपंचांची बैठक घेऊन त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणला आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना ताकद दाखवून दिली.
Sarpanch in Akkalkot
Sarpanch in AkkalkotSarkarnama
Published on
Updated on

अक्कलकोट : अक्कलकोट (Akkalkot) विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यात २६ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल (Result) जाहीर झाला. निकालानंतर भाजप (BJP), काँग्रेस (Congress) व अन्य पक्षाकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी आज एकूण २० सरपंचांची बैठक घेऊन त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणला आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना ताकद दाखवून दिली. दरम्यान, याच सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दूरध्वनीवरून नूतन सरपंचांचे खास अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. (Fadnavis wishes the new sarpanch in Akkalkot)

आमदार कल्याणशेट्टी यांनी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याला २६ पैकी २० सरपंचांनी उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांकडून १६ सरपंच निवडून आल्याचा केलेला दावा कल्याणशेट्टी यांनी फोल ठरवला आहे. या सरपंचांना शुभेच्छा देत आगामी काळात सर्व सरपंचांनी सत्ताधारी-विरोधक असा कोणताही भेदभाव न करता गावच्या विकासाचा ध्यास घेऊन सर्वांनी कार्य करावे. त्यासाठी आमदार म्हणून मी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. आपल्या गावातील कामांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. सरपंचांनी आापपल्या गावच्या समस्या मांडाव्यात आणि त्यासाठी निधीची तरतूद करून घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहनही कल्याणशेट्टी यांनी केले.

Sarpanch in Akkalkot
नारायणआबा टेन्शन घेऊ नका; सर्व काही ठिक होईल : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला 'हा' शब्द

दरम्यान, याच सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून नूतन सरपंचांचे खास अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने आता गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात निधी देण्यास सुरुवात केली आहे. त्या सर्व निधींचा उपयोग करावा आणि आपल्यावर जनतेने जो प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला सर्वांनी पात्र राहून काम करावं, असे आवाहनही केले.

Sarpanch in Akkalkot
‘शहाजीबापू, वसंतदादा सूतगिरणी, राधाकृष्ण संघ, क्रेडीट सोसायटीचे काय झालं तेही सांगा’

या सत्कार सोहळ्याला कोन्हाळी,दहीटणेवाडी, खानापूर, अंकलगी, रूद्देवाडी, शिरवळ, शिरवळवाडी, सदलापूर, आरळी, दर्शनाळ, तोगराळी, गंगेवाडी, दर्गनहळळी, आचेगाव, रामपूर, अंकलगे, घोळसगाव, सुलतानपूर, बोरेगाव, नाविंदगी आदीसह विस ग्रामपंचायत सरपंच आणि उपस्थित सदस्यांचही सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com