Dhananjay Mahadik, Prakash Awade angry on Hasan Mushrif
Dhananjay Mahadik, Prakash Awade angry on Hasan MushrifSarkarnama

Kolhapur Basket Bridge News : ...म्हणून पालकमंत्री मुश्रीफांसमोर भर बैठकीत धनंजय महाडिक, प्रकाश आवाडेंनी व्यक्त केला संताप!

Dhananjay Mahadik, Prakash Awade angry on Hasan Mushrif : तुम्हाला त्यांचा अपमान करायचा आहे का? असा सवाल करत खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
Published on

Kolhapur Politics कोल्हापूर जिल्ह्यात एक दशक चर्चेचा विषय राहिलेल्या बास्केट ब्रिजवरून आणि करंजीच्या पाणी प्रश्नावरून खासदार धनंजय महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडे हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलेच संतापलेले दिसले.

बास्केट ब्रिजची वर्क ऑर्डर निघून काही महिने झाले तरी काम सुरू नाही. या कामात राजकारण सुरू आहे का? या ब्रिजचे भुमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केले होते. तुम्हाला त्यांचा अपमान करायचा आहे का? असा सवाल करत खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

Dhananjay Mahadik, Prakash Awade angry on Hasan Mushrif
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार पडणार; हसन मुश्रीफांचे भाकीत

इचकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी देखील इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर प्रशासन आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांना जाब विचारला. 'मुश्रीफ साहेब तुम्हाला इचलकरंजीला पाणी मिळायला नको अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल आवाडे यांनी केला. त्यामुळे आम्हाला सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांकडून आणाव्या लागतात.'

तसेच 'प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे काही घेणे देणे नाही. जे प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहीजे. इचलकरंजी शहरात पाण्याच्या सहा टाक्या मंजूर झाल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले?' असा प्रश्न आवाडे यांनी विचारला.

Dhananjay Mahadik, Prakash Awade angry on Hasan Mushrif
Sanjay Mandalik : 'मंडलिकांना वगळून कोणी आमदार होऊ शकत नाही', माजी खासदाराचा महायुतीच्या नेत्यांना इशारा

यावेळी खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) म्हणाले, ‘बास्केट ब्रिज या संकल्पनेची राजकारणातून खिल्ली उडवली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प मंजूर केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केले. त्यानंतर निविदा निघाली, वर्क ऑर्डरही मिळाली तरी अद्याप ब्रिजच्या कामाला सुरूवात झालेली नाही.

मात्र त्यावर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पूल पिलरचा करायचा आहे. त्याचा नवा आराखडा बनवला जाणार आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे. असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर आवश्यक ते बदल करून त्वरीत काम सरू करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी व अन्य ब्रिजसाठी एक कन्स्लटंट नेमावा. त्यामुळे दिल्लीमधून निधी आणता येईल. असे महाडिकांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com