धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील; करुणा मुंडेंच्या आरोपाने खळबळ

karuna munde| Dhananjay munde| धनंजय मुंडें आणि माझ्यावर एखादा सिनेमा बनवला तर महाराष्ट्रातील राजकारणच समोर येईल
karuna munde| Dhananjay munde
karuna munde| Dhananjay munde
Published on
Updated on

सोलापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि त्यांच्या पत्नी करूणा मुंडे (Karuna munde) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. असे असतानाच आता करूणा मुंडे यांनी कोल्हापूर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर करूणा मुंडे यांनी आज पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन घेतले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंबाबत पुन्हा धक्कादायक खुलासा केला आहे. (Latest political news in marathi)

धनंजय मुंडे पाच सहा मुलांचे वडील आहे. तरी अद्यापही ते मंत्रीपदावर कायम आहेत, असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडेंच्या या आरोपाने आता राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडें आणि माझ्यावर एखादा सिनेमा बनवला तर महाराष्ट्रातील राजकारणच समोर येईल, करुणा मुंडेवर सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शकांची लाईन लागली असल्याचा दावाही करूणा मुंडेंनी केला आहे. तसेच 2024 मध्ये आपण परळीमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

karuna munde| Dhananjay munde
असा' होणार योगी आदित्यनाथांचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा

तसेच, आज देशात गरीबी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, महागाई, शेतकरी आत्महत्या,सारखे महत्वाचे विषय असताना देशातील बडे नेतेच काश्मीर फाईल्स चित्रपटावर चर्चा करतात, हा मुर्खपणा आहे, असा टोलाही त्यांनी राज्यसरकारला लगावला आहे. इतकेच नव्हे तर, माझे पती धनंजय मुंडे यांनी मला तुरुंगात टाकले. पण त्याबद्दल एकही बोलायला तयार नाही. पण काश्मीर फाईल्स हा एक चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. त्यामुळे नेत्यांना बोलायचे असेल तर त्यांनी दिशा सॅलियन, पुजा चव्हाण आणि करूणा शर्मां यांसारख्या प्रकरणांवर बोलायला हवे, असे आवाहनही करुणा मुंडेंनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com