Dhangar Reservation News : धनगर समाजाचे आंदोलन फक्त स्थगित; निर्णय न घेतल्यास सरकार विरोधात राज्यभर रान उठवणार...

Ahmednagar Chaundi News: 50 दिवसांनंतर सरकार धनगर आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय घेते याकडे समाजाचे लक्ष असेल.
Dhangar Reservation News
Dhangar Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने धनगर समाजाचे उपोषण मागे घेण्यात आले असते तरी 50 दिवसांत धनगर आरक्षणाबाबतचा निर्णय न घेतल्यास सरकार विरोधात राज्यभर रान उठवणार असल्याची माहिती आहे.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने गेले 21 दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे सुरू असलेले उपोषण आंदोलन गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महाजन यांनी येत्या 50 दिवसांमध्ये धनगर आरक्षणाबाबत कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Dhangar Reservation News
MP BJP Candidates List: मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदार विधानसभेच्या रिंगणात; भाजपकडून दुसरी यादी जाहीर

गेले 21 दिवस उपोषण करणारे अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी गिरीश महाजन, राम शिंदे, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगे यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन आपले उपोषण सोडले. उपोषण सुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना रूपनवर आणि बंडगर यांनी सरकारने आज सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. यामध्ये काही तांत्रिक गोष्टी असल्याच्या कारणाने सरकारला आपण आम्ही 50 दिवस निर्णय घेण्यासाठी दिलेले आहेत. मात्र, आज जरी उपोषण आंदोलन थांबलेले असले तरी एकूण मागणीसाठी असलेले आंदोलन यापुढेही सुरूच राहील, अशी माहिती दिली.

50 दिवसांनंतर सरकार धनगर आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे समाजाचे लक्ष असेल. सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशाबाबत योग्य तो निर्णय घेतला नाही, तर राज्यभर धनगर समाज तीव्र आंदोलन सुरू करेल. रास्ता रोको, उपोषण आंदोलने, धरणे आदींच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र भूमिका यशवंत सेनेच्या वतीने घेतली जाईल, असं ररूपनवर आणि बंडगर यांनी सांगितलं.

Edited By : Mangesh Mahale

Dhangar Reservation News
Shiv Sena MLA Disqualification : राहुल नार्वेकरांकडून वेळकाढूपणाची हद्द; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com