Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; सलाइन लावण्याची वेळ...

Dhangar Reservation Protest in Choundi : गेल्या 13 दिवसांपासून यशवंत सेनेच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
Dhangar Reservation News
Dhangar Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahemdnagar News : धनगर समाजाला अनुसुचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे यशवंत सेनेचे कार्यकर्ते आमरण उपोषण करत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच अण्णासाहेब रुपनवर यांची तब्येत खालावल्याने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज (17 सप्टेंबर) रोजी दुसरे उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांचीही तब्येत आज सकाळी अचानक खालावल्याने त्यांच्यावर तातडीने डॉक्टरांनी उपचार केले. त्यांना सध्या सलाईन लावून उपचार करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप घेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे. चौंडी येथे राज्यभरातील यशवंत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले असून माजी मंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. पुढील आंदोलन हे तीव्र असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यामध्ये रमेश जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन राज्यात गाजले. त्यानंतर त्यांच्या गावी जात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याच्या आत आरक्षणाबाबत निर्णय होईल असे आश्वासन दिले आहे. मात्र, यामध्ये अनेक कायदेशीर अडचणी असल्याने राज्य सरकार मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देणार याबद्दल विचार मंथन सुरू आहे.

दुसरीकडे धनगर समाजाने आपल्याला एटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. धनगर समाजाची ही मागणी अनेक वर्षांची असून वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाबाबत आश्वासन दिलेली आहेत. धनगर समाजाने आता आक्रमक पाऊल उचलून धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे या माध्यमातून राज्य सरकारकडे आरक्षणासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

याचाच भाग म्हणून चौंडी येथे गेल्या 13 दिवसांपासून यशवंत सेनेच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. कालच(16 सप्टेंबर) नगर आणि चौंडी येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत येत्या दोन दिवसात याबाबत राज्य सरकार ठोस निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. यानंतर आज चौंडीतील उपोषण करते सुरेश बंडगर यांची प्रकृती घालवल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

यशवंत सेनेच्या वतीने चौंडीमध्ये समाजाची आज रविवारी बैठक बोलवण्यात आलेली असून, आरक्षणाबाबत पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. पुढील आंदोलन सध्या सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा तीव्र स्वरूपात केले जाईल, अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com