Dhangar Aarakshan : आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; मंगळवेढ्यात मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन

Dhanagar Reservation: गेल्या काही दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
Dhangar Aarakshan
Dhangar Aarakshan Sarkarnama

Magalvedha News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच आता मंगळवेढा तालुक्यात सकल धनगर समाजाच्यावतीने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मेंढ्यासह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान 'बीआरएस'चे नेते भगीरथ भालके यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. "धनगर आरक्षणात 'र' चे 'ड' करून समाज व समाजातील भविष्याच्या पिढीचे मानगूट मुरगाळण्याचे काम नेते मंडळींनी केले आहे", असा आरोप भगीरथ भालकेंनी केला.

पंधरा दिवसांपूर्वी आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. बहुजन समाजाला राज्यकर्ते गृहीत धरून चालत असेल तर भविष्यातील पिढीसाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भालकेंनी दिला.

Dhangar Aarakshan
Amravati BJP Politics: अमरावती भाजपत अंतर्गत कलह वाढला; खासदार तडस यांच्यावर पक्षातील पदाधिकारीच नाराज ?

"संविधानाने 36 नंबरवर धनगराचा प्रश्न 'र' व 'ड'च्या कात्रीत अडकवलेला आहे. शासनाने न्यायालयात धनगर व धनगड हे एकच जात असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने जातीच्या दाखले देण्यास सुरुवात करावी, मी जरी आज भाजपमध्ये असलो तरी आधी समाज नंतर पक्ष ही माझी भूमिका आहे. त्यामुळे समाजाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे", असं मत माऊली हळणवर यांनी मांडले.

"1953 च्या एसटी आरक्षणाच्या सुचित धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती, मागास व भटका समाज असल्याने एसटी सूची त्याचा समावेश केला. पण त्याची अंमलबजावणी केली नाही. आज 75 वर्षानंतर देखील त्याच अंमलबजावणीसाठी लढा देण्याची वेळ आली आहे. भविष्यात देखील यापेक्षा तीव्र लढा उभा करावा लागेल", असं युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीकिरण कोळेकर म्हणाले.

ज्याप्रमाणे धनगर आरक्षणावरून राज्यकर्ते सत्तेत आले, त्याप्रमाणे हा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांना सत्तेबाहेर खेचू शकतो, याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा अॅड. बापू मेटकरी यांनी यावेळी दिला.

Edited By- Ganesh Thombare

Dhangar Aarakshan
Amravati BJP Politics: अमरावती भाजपत अंतर्गत कलह वाढला; खासदार तडस यांच्यावर पक्षातील पदाधिकारीच नाराज ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com