Satara NCP News : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना मौन बाळगणे पसंत केले आहे. आज साताऱ्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, याबाबत माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, एवढे सांगून अधिक बोलणे टाळले.
सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील Dilip Walse Patil हे आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने साताऱ्यात आहेत. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी जयंत पाटील आणि एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं.
अजितदादांना अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र तेव्हा अजित पवार अध्यक्षपदी नको म्हणाले होते, असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला होता. यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, असं सांगत वळसे-पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जीगाव प्रकल्पात थेंबभर पाणी नाही, हे धरण अजून पूर्ण झालं नाही. मग 3,300 कोटींचं टेंडर कशासाठी निव्वळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी 3,300 कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे. त्याबाबतही दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा, असे ते म्हणाले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.