Satyajeet Tambe : नगर जिल्ह्यात नवीन राजकीय समिकरणांची नांदी? सत्यजीत तांबे-विखे पाटीलांची भेट

Thorat vs Vikhe Patil : सत्यजीत तांबेच्या आभार दौऱ्यातील भेटी-गाठींकडे लक्ष
Satyajeet Tambe, Rajendra Vikhe
Satyajeet Tambe, Rajendra VikheSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe : विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC) नाशिक पदवीधर मतदार संघातून आमदार सत्यजीत तांबे अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसने आम्हाला पक्षाबाहेर ढकलण्याचे सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केला. दरम्यान भाजपही तांबे यांना खुली ऑफर देत आहे. त्यानंतर आज सत्यजीत तांबे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी भाजपमध्ये यावे अशी थेट ऑफर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी दिली आहे. मात्र तांबे कुटुंबीय काँग्रेसचे एकनिष्ठ आहे, असे ते वारंवार सांगत होते. निवडणुकीनंतर मात्र तांबे यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. तांबे म्हणालेत की, अपक्ष निवडणूक आलो आहे, आता अपक्ष म्हणूनच काम करणार आहे.

Satyajeet Tambe, Rajendra Vikhe
Chhagan Bhujbal; भीमाशंकरच का तुळजापूरही देऊन टाका!

सत्यजीत तांबे हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून थोरात यांच्याबाबतही काँग्रेसच्या नेत्यांनी कुरघुडी केल्यांचा आरोप तांबे यांनी केला. दरम्यान विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष राज्याभरात परिचित आहे.

दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना उघडपणे पाठिंबा दिला. राजेंद्र विखे यांनीही तांबे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध केला होता.

Satyajeet Tambe, Rajendra Vikhe
Girish Bapat : बापट म्हणाले... हेमंतचं काम चांगलं; थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज

या दरम्यान तांबे यांनी राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे सध्या त्यांच्या मतदारसंघातील आभार दौरा करीत आहेत. त्यातून ते मतदरासंघातील तालुक्यांना भेटी देत आहेत. त्या अनुषंगानेच त्यांनी विखे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com