Maharashtra Vs Karnataka : 'अलमट्टी'वरून महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटणार? सांगली, कोल्हापूरला धोक्याची घंटा

Almatti Dam Height Dispute : कर्नाटकने भू-संपादनसाठी ड्रोन सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा मागवल्या
Flood in Sangli, Almatti  Dam
Flood in Sangli, Almatti DamSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur Political News : केंद्रीय जलआयोगाने कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाकडून नव्याने भूसंपादन होणार असून, आवश्यक सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढली तर त्याचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला निर्माण होणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी यापूर्वीही वाद झालेला आहे. आता कर्नाटकाने पुन्हा तीच नाटके सुरू केल्याने उभय राज्यांत भडका उडण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Flood in Sangli, Almatti  Dam
Kolhapur Politics : चंद्रकांतदादांनी बाहेरच्यांना डोक्यावर बसवलं, तर घाटगेंनी पक्ष मोडकळीस... ; भाजप निष्ठावंतांची भळभळती जखम बाहेर...

आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटर असून, १२३ टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. कर्नाटक आता ५२४.२५६ इतकी उंची करणार असल्याने पाणीसाठ्याची क्षमता २०० टीएमसी इतकी होणार आहे. कोल्हापुरातून पंचगंगा आणि सांगलीतून कृष्णगंगा या नद्याही अलमट्टी धरणाला जाऊन मिळतात. पावसाळ्यात नेहमी या दोन नद्यांना महापुराचा धोका असतो.

कर्नाटक प्रशासनाने पाणी अडवण्यास सुरुवात केल्यानंतर अलमट्टी धरणाच्या पाण्याचा फुगवटा (बँक वॉटर) वाढणार आहे. परिणामी सांगलीतील अनेक गाव आणि कोल्हापुरातील शिरोळ तालुका पाण्याखाली जाईल. आताच शिरोळमधील साडेपाच ते सहा हजार एकर जमीन नापीक होण्याचा धोका आहे. उंची वाढल्यानंतर त्याचा फटका अधिक बसणार आहे. (Maharashtra Political News)

सध्या कर्नाटक सरकारने भू-संपादनासाठी ड्रोन सर्वेक्षण कामाचा ठेका देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. कृष्णा भाष्य जल निगमकडून याचे काम सुरू आहे. कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या परिस्थितीवर दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक कोल्हापुरात झाली होती.

अलमट्टीच्या प्रश्नाबाबत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असावा, असा तोडगा या बैठकीत निघाला होता, पण कर्नाटक सरकारने एकदाही उंची न वाढवण्याची हमी दिली नव्हती. उलट कर्नाटक सरकार उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर, सांगलीला कोणता धोका निर्माण होणार नाही, असे म्हणत असल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Flood in Sangli, Almatti  Dam
Pandharpur-Mangalwedha : पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात वाटचाल ठरणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com