Atul Bhosale, Prithviraj Chavan
Atul Bhosale, Prithviraj Chavansarkarnama

Grampanchayat Election News : डॉ. भोसले गटाची पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी; रेठरे बुद्रुकला सात जागा बिनविरोध

Rethare Budruk रेठरे बुद्रुक गाव राजकीयदृष्ट्या जागरूक व संवेदनशील असून, या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे.
Published on

Karad Grampanchayat Election News : कराड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आमदार पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या सात जागा बिनविरोध झाल्या असून, गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या जागरूक व संवेदनशील समजले जाते. या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू झाली आहे. सरपंचपदासह १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण ९२ जणांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी भोसले Atul Bhosale गटाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधी आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan गटाने सुरू केले होते.

मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी भोसले गटाने सात जागा बिनविरोध निवडून आणत, विरोधकांच्या प्रयत्नांना जबर खीळ घातली आहे आणि या निवडणुकीत यशस्वी आघाडी घेतली आहे. अर्ज माघारीच्या दिवशीच सात जागांवर यश लाभल्याने भोसले गटाचा उत्साह दुणावला आहे. Maharashtra Political News

तर विरोधी गटाला मात्र मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागल्याने आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात निराशेचे चित्र आहे. सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीचे विठ्ठल वॉर्डमधून शरद नामदेव धर्मे, मारुती वॉर्डमधून रुक्साना गुलाब मुल्ला, शिवनगर वॉर्डमधून संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव.

Atul Bhosale, Prithviraj Chavan
Karad News : जगातील युनिक भूकंप संशोधन केंद्र कऱ्हाडला बनवणार : केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू

लक्ष्मी वॉर्डमधून शर्मिला संतोष मोहिते, भाग्यश्री रोहित पवार अशा एकूण ७ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवनगर वॉर्डमधील सर्वच जागांवर सत्ताधारी भोसले गटाचे समर्थक निवडून आले आहेत.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com