दोन नाईकांमुळे भाजपच्या महाडिक-देशमुखांसमोर तगडं आव्हान

सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली.
Shivajirao Naik, Mansingrao Naik
Shivajirao Naik, Mansingrao NaikSarkarnama

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) घरवापसी झाली. ही घरवापसीने शिराळा मतदारसंघातील राजकीय समीकरणंच बदलून टाकली आहेत. आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) आणि शिवाजीराव नाईक हे दोन नाईक एकत्र आल्याने भाजपसमोर आता तगडं आव्हान उभं राहिलं असून मतदारसंघातून भाजपला हादरे बसू लागले आहेत.

शिराळा (Shirala) मतदारसंघात भाजपची (BJP) धुरा प्रामुख्याने सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक या नेत्यांवर आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये असताना त्यांनी देशमुखांच्या मदतीने भाजपची ताकद वाढवली होती. त्यामुळे आमदार नाईकांच्या अडचणी वाढत चालल्या होत्या. त्यातच आमदार नाईक यांनी देशमुख यांच्या साथीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

Shivajirao Naik, Mansingrao Naik
ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली: मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं

आता शिवाजीरावांच्या राष्ट्रावादी प्रवेशानं संपूर्ण राजकीय गणितंच बदलून गेली आहे. आधी कट्टर विरोधक असलेले दोन्ही नाईक यांची एकी झाली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे देशमुख आणि महाडिक यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दोन्ही नाईक गट सक्रीय झाल्याने देशमुख-महाडिकांसमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे.

नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर शिराळा व वाळवा तालुक्यातील भाजपचे अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामध्ये त्यांच्या शिवाजी केन व यशवंत ग्लुकोज या संस्थांच्या पुनरुज्जीवन हे एक कारण असल्याचे मानले जाते. याबाबत नाईक यांनीही यापूर्वीच संकेत दिले होते.

Shivajirao Naik, Mansingrao Naik
आमदार कोकाटे समर्थकांनी पराभवाची परतफेड केली

दरम्यान, नुकत्याच झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. यावेळी नाईक यांनी पक्षात प्रवेश करताच शरद पवार यांनी जयंत पाटील यांना एक खास विनंती वजा आदेश दिला आहे. आपण एकदा शिवाजीरावांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य कारभारासाठी कसा होईल, यावर चर्चा करू. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आणि अनुभवाचा आपल्याला राज्यपातळीवर नक्कीच फायदा होईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com