यामुळे मंत्री शंकरराव गडाखांची होतेय वाहवा..

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे या निमित्ताने वाहवा होत आहे.
Shankarrao gadakh
Shankarrao gadakhSarkarnama
Published on
Updated on

सोनई ( जि. अहमदनगर ) - खंडीत वीज पुरवठा व उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीपीक व पिण्याच्या पाण्याची गरज असताना मुळा कालव्याचे आवर्तन सुटले. बंधाऱ्याची व पाण्याची गाठ झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे या निमित्ताने वाहवा होत आहे. ( Due to this, Minister Shankarrao Gadakh is getting applause. )

मंत्री होण्याच्या अगोदर पासुन गडाख यांनी नेवासे तालुक्यात जलसंधारणचे मोठे काम केलेले आहे. या महिन्याच्या सुरवातीला वीज मंडळाने थकीत वीज बिलापोटी अनेक जनित्र बंद केले. परिणामी शेवटच्या पाण्यावर असलेल्या गहू, हरबरा, कांदा पिकाची अडचण झाली होती. ही अडचण असतानाचा मुळा कालव्याचे आवर्तन सुरू झाले आणि शेतपिकाला संजीवनी मिळाली. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आवर्तनातून काही बंधारे अर्धवट भरुन घेतल्याने जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

Shankarrao gadakh
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

2013 ला मंत्री गडाख यांनी आमदार असताना विविध संस्था व लोकसहभागातून तालुक्यातील साठवण बंधारे - 155, पाझर तलाव - 18, गावतळी - 23 व साखळी बंधारे 145 अशा एकुण 340 बंधाऱ्याची दुरुस्ती करुन घेतली होती. या कामातून निघालेला साडेतेरा लाख ब्रास गाळ बाराशे एकर शेतीला टाकल्याने ती शेती आता बागायती झाली. गडाखांच्या प्रयत्नातून झालेले जलसंधारणचे काम आज सर्वांना फलदायी ठरत असल्याने मंत्री गडाखांची वाहवा होत आहे.

सोनई, घोडेगाव, चांदे भागतील अनेक बंधारे आवर्तनातून भरुन घेतल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. घोडेगाव येथील बंधारा भरुन घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. विहिरी व कुपनलिकेने तळ गाठल्याने नगदी पिकाबरोबरच ऊसपीकासाठी आवर्तन महत्वाचे ठरले आहे.

Shankarrao gadakh
मंत्री शंकरराव गडाख पारावरच्या गप्पात झाले दंग...

गहू, हरभरा, कांदा व चारापिकाची अवस्था रामभरोसे झाली होती. मुळा धरणातून वेळेला आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या माध्यमातून फायदा होईल. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची बंधारे दुरुस्ती संकल्पना खुपच हिताची ठरत आहे.

- संतोष तांबे, शेतकरी, देडगाव, ता. नेवासे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com