Hasan Mushrif News : हसन मुश्रीफांना ईडीचा पुन्हा दणका; कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर छापेमारी

Hasan Mushrif Kolhapur News : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची पुन्हा कारवाई
Hasan Mushrif News
Hasan Mushrif NewsSarkarnama
Published on
Updated on

ED Action News : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने (ED) आज (ता. 1) छापेमारी केली. कागल तालुक्यातील सेनापती कापशीच्या शाखेमध्येही ईडी अधिकारी पोहोचले.

गेल्या महिन्यातच हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता जिल्हा बॅंकेवर छापेमारी करण्यात आली आहे. जिल्हा बॅंक अनेक वर्ष मुश्रीफांच्या ताब्यात आहे.

Hasan Mushrif News
Education Budget 2023 : अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; होणार थेट 'हा' फायदा

तसेच 11 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यामध्येही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. शिवाजीनगर येथील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातही अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे.

Hasan Mushrif News
Union Budget 2023 : अर्थसंकल्पात पॅन कार्ड संदर्भात मोठी घोषणा; अर्थमंत्री म्हणाल्या...

ईडीने केलेल्या छापेमारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. ईडी कारवाई भाजपच्या जिल्हा अध्यक्षांच्या इशाऱ्याने झाल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. ईडीच्या छापेमारीनंतर आरोप करणाऱ्या भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौरा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com