Jaykumar Gore News : आमदार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुखांच्या घरांवर ईडीची धाड; दबावतंत्राचा वापर ?

Satara ED raids l News : मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी सात वाजता ईडीने धाड टाकली आहे.
Jaykumar gore
Jaykumar gore sarkarnama
Published on
Updated on

Satara News : खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात मृत झालेल्या शेकडो रुग्णांना जिवंत दाखवले व त्या आधारे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले होते. हे प्रकरण चव्हाट्यावर आणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी सात वाजता ईडीने धाड टाकली आहे.

आमदार जयकुमार गोरे ( Jaykumar Gore) यांच्यावर मृत लोकांच्या नावाने कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवशेनात या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आवाज उठवला होता. अधिवेशनातील चर्चेवेळी आमदार जयकुमार गोरे आणि आमदार जयंत पाटील यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. (Jaykumar Gore News)

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादरम्यानच ईडीचे पथक मायणी येथील देशमुखांच्या घरी शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास दाखल झाले.

दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख हे घरातच नाहीत. घरात फक्त त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुले आहेत. या महिला व लहान मुलांवर ईडीचे अधिकारी दमदाटी करीत असल्याची माहिती देशमुख कुटुंबाकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली. त्यामुळे भाजपकडून आमदार गोरे यांना वाचवण्यासाठी तर हे दबावतंत्र वापरले जात नाही ना? असा सवाल लोकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

Jaykumar gore
Congress News : कोल्हापूर दक्षिणेत महाडिक गटाला खिंडार; गांधीनगरच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य लागले पाटील गटाच्या गळाला

काय आहे नेमके प्रकरण ?

27 मे 2020 पासून मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी ताब्यात घेतले होते. येथे कोरोना उपचार केंद्र चालवले जात होते. संबंधित रुग्णालय आधीपासूनच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न होते.

संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे यांच्यासह अन्य आरोपींनी मृत कोरोना रुग्णांवर उपचार तसेच कर्तव्यावर नसलेल्या डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमधून गैरव्यवहार केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Jaykumar gore
Maharashtra Police News : मोठा निर्णय! वरिष्ठांना मर्जीतील पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी...

दरम्यान, कोरोनाकाळात मृत रूग्णांना जिवंत असल्याचं दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप करत साताऱ्यातील एका व्यक्तीनेभाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्यानं घ्या, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयानं सातारा पोलिसांनी दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयानं पोलिसांचीही कानउघडणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com