पाटण: राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदार संघातील ९० पैकी तब्बल ६४ ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून चोख उत्तर दिले.
हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजकीय उठावाच्या भूमिकेला लोकमान्यता मिळून राजमान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज यांच्या या दैदिप्यमान कामगिरी साठी पाटण मतदार संघातील ६४ ग्रामपंचायतींना तातडीने विशेष पॅकेज देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली.
दरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाटण मतदार संघातील जनतेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही दिलेली अनोखी भेट असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. ते पाटण मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, डॉ.दिलीपराव चव्हाण, विजय पवार, सुरेश पानस्कर, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, सोमनाथ खामकर, नामदेवराव साळूंखे, शशिकांत निकम, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, विजय पवार, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे, संजय देशमुख, भरत साळूंखे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, जालंदर पाटील, मनोज मोहिते, नाना साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सदैव सहकार्य असून सातारा जिल्ह्याला विकासनिधी कधीही कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.