बारामतीसह पुणे विभागातील ४१ नगरपरिषदांची निवडणूक गेली पुढे; प्रशासक झाले नियुक्त

ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) कुठलीच निवडणूक न घेण्याचा ठराव राज्य विधीमंडळात करण्यात आला आहे.
Local Body Election

Local Body Election

Sarkarnama

Published on
Updated on

पिंपरी : ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीच निवडणूक न घेण्याचा ठराव राज्य विधीमंडळात सोमवारी (ता.२७ डिसेंबर) केला गेला. त्यानंतर लगेचच राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला (Local Body Election) राज्य सरकारकडून ब्रेक लावण्यात आला आहे. मुदत संपत आलेल्या राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलून तेथे आता प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारीच त्याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश जारी केला. त्यात पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे, बारामती, जेजूरी आदी दहा तर, पुणे विभागातील ४१ नगरपरिषदा आहेत. त्यांची मुदत या महिन्या अखेर तसेच, पुढील महिन्यात संपत आहे.

<div class="paragraphs"><p>Local Body Election</p></div>
महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) तिढ्यामुळे खरं तर प्रशासक नियुक्त झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, वाढत्या कोरोनाचे (Covid-19) कारण त्यासाठी देण्यात आले आहे. या साथीमुळे काही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. तर, मुदत संपणाऱ्या काही नगरपरिषदांत त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करावे लागत असल्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक (Mahesh Pathak) यांनी प्रशासक नियुक्तीच्या या आदेशात म्हटले आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मुदत ६ जानेवारीला संपत आहे. तेथे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत संदेश शिर्के (Sandesh Shirke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १० जानेवारीला मुदत संपणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेवर (Lonavla Municipal Council) तेथील मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्याखेरीज बारामती, दौंड, आळंदी, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, सासवड, शिरूर या नगरपरिषदांवरही स्थानिक प्रांत, मुख्याधिकारी, तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Local Body Election</p></div>
रोहिणी खडसेंवरील हल्ला; आक्रमक राष्ट्रवादीचा २४ तासांचा अल्टीमेटम!

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर आणि वाई या आठ, तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, अष्टा, तासगाव आणि पलूस अशा पाच नगरपरिषदांवर प्रशासक नेमले गेले आहेत. पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दुधणी, करमाळा, कुर्डूवाडी, मैंदगी, मंगळवेढा सांगोला या सोलापूर, तर इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा आणि वडगाव अशा कोल्हापूरातील नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com