Political News : आईच्या नावावरचे अतिक्रमण भोवले; कोरोचीचे सरपंच झाले अपात्र

Kolahapur News : बेकायदेशीर अतिक्रमण चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
Santosh bhore
Santosh bhore Sarkarnama
Published on
Updated on

Kolahapur News : हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील सरपंचाच्या आईच्या नावे गायरानातील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा प्रकार पुढे आला होता. त्यामुळे काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता, हे बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे पुढे आले. हे प्रकरण कोरोचीच्या सरपंचांना चांगलेच भोवले आहे.

कोरोचीचे सरपंच संतोष सखाराम भोरे यांच्या आईच्या नावाने गायरानातील असलेले बेकायदेशीर अतिक्रमण चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरपंचपदावरून अपात्र केले. या कारवाईमुळे गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच अतिक्रमणधारक पदाधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

Santosh bhore
Nanded Congress News : काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलसाठी नांदेडात आज गुप्त बैठक; चार निरीक्षक दाखल...

सरपंच भोरे यांची आई शालाबाई सखाराम भोरे यांनी सरकारी मालकीच्या गायरान गट नं. १०३५/अ मध्ये आरसीसी घर बांधलेले आहे. त्यामुळे संतोष भोरे यांची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (१) नुसार कोरोची ग्रामपंचायतीतील (Grampnachayat) सदस्यपद अपात्र घोषित करावे, असा तक्रारी अर्ज संतोष वाधेला, देवानंद कांबळे यासह इतरांनी केला होता.

सुनावणीवेळी सरपंच संतोष भोरे यांनी त्यांची आई शालाबाई यांना एनआरईपी घरकुल योजनेतून शासनाने सन १९८४ मध्ये घर दिले होते. त्यामुळे त्या शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले नाही. योजनेंतर्गत घर बांधले असल्याने पुढील काळात बांधकाम परवाना व असेसमेंट उतारे ग्रामपंचायतीने दिले होते, असे स्पष्टीकरण दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शालाबाई सखाराम भोरे यांच्या मालमत्ता क्र. १६९७ चे अतिक्रमण ग्रामपंचायत गायरान गट क्र. १०३७/अ मध्ये असल्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख हातकणंगले यांच्याकडील मोजणी नकाशावरून स्पष्ट झाले.

दरम्यान, सरपंच भोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांचा (Collector office) आदेश मान्य नसल्याचे सांगत हे आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, त्या ठिकाणीही सरपंच गोरे यांचे अतिक्रमण सिद्ध झाले. दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी त्यांना सरपंच पदावरून अपात्र केले असून, या संपूर्ण प्रकरणावर न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सरपंच संतोष भोरे यांनी सांगितले आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

R

Santosh bhore
Nagar Political : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर गुन्हा ; काय आहे प्रकरण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com