Nagar Political : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर गुन्हा ; काय आहे प्रकरण...

Sarpanch Bhondve filed a complaint in Kharda police station : खर्डा पोलीस ठाण्यात सरपंच भोंडवे यांनी दिली फिर्याद, अन्य दोघांवरही गुन्हा
Crime
CrimeSarkarnama
Published on
Updated on

- ओमकार दळवी

Nagar News : गावातील अंगणवाडी वेळेवर का उघडली नाही म्हणून जामखेड तालुक्यातील घोडेगावचे सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी अंगणवाडीच्या वरीष्ठ महिला पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार केली. याचा राग आल्याने जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे यासह अन्य दोन जणांनी सरपंच शरद भोंडवे यांना मारहाण केली.

या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात सरपंच भोंडवे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे, शंकर विष्णु भोंडवे व अनिल उर्फ महावीर शिवाजी कडू (सर्व रा. घोडेगाव, ता. जामखेड) या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी 29 नोव्हेंबरला गावातील अंगणवाडी क्रमांक 23 ही सकाळी उघडली नव्हती.

Crime
Kolhapur News: धक्कादायक: मुलासमोरच बापावर झाडल्या गोळ्या, कोल्हापुरात लॉज चालकाचा खून

या अंगणवाडीची दैनंदिन वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजतेपर्यंतची आहे. त्यामुळे शरद भोंडवे यांनी सरपंच म्हणून सोनेगावच्या बीट पर्यवेक्षिका आढाव यांच्याकडे तक्रार केली. अंगणवाडी वेळेवर उघडत नाही, अशा तक्रारीचे स्वरुप होते. या अंगणवाडीत जामखेड बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे यांची पत्नी त्रिशाला या मदतनीस म्हणून काम करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तक्रार झाल्यामुळे विष्णु भोंडवे यांना राग आला. सरपंच शरद भोंडवे यांना ग्रामपंचायत कार्यालयात येऊन त्यांनी जाब विचारला. यावेळी यांच्यात वाद झाले. हे वाद बाचाबाचीनंतर मिटले. सरपंच शरद भोंडवे हे 3 जानेवारीला गावातील जिल्हा परिषद शाळेतील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास उपस्थित होते. यानंतर त्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस महिला आणि अंगणवाडी सेविका आल्या.

त्यांनी सरपंच शरद भोंडवे यांना संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठिंब्याचे पत्र द्या, असे सांगितले. याचवेळी शंकर भोंडवे, विष्णु भोंडवे हे त्याठिकाणी आले. तिथे सरपंच शरद भोंडवे यांना मारहाण करण्यात सुरूवात केली. तर अनिल उर्फ महावीर शिवाजी कडू याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी झालेले सरपंच शरद भोंडवे यांना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सरपंच शरद भोंडवे यांनी दिलेल्या जबाबावरून खर्डा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी रईस खलील शेख हे तपास करत आहेत.

(Edited by Amol Sutar)

Crime
NCP News : अजित पवार औरंगजेबाचे पाठीराखे झालेत का? राष्ट्रवादीतच जुंपली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com